IB Recruitment Intelligence Bureau Government Job For SSC Pass Marathi News;देशाच्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IB Recruitment: दहावी उत्तीर्ण असून सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती सुरु आहे. याअंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळणार आहे. टियर 1 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरोने, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ग्रेड-2/टेक्निकलच्या एकूण 797 पदांसाठी भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा आता नवीन जारी केला आहे. याअंतर्गत एकूण 677 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

आयबीने एम्प्लॉयमेंट न्यूज वीक 14-20 ऑक्टोबर 2023 मध्ये यासंदर्भात जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सुरक्षा सहाय्यक / मोटर ट्रान्सपोर्ट (SA/MT) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ / जनरल (MTS/जनरल) च्या एकूण 677 पदांसाठी भरती केली जाणार आहे.

इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत मोटर ट्रान्सपोर्ट, मल्टी-टास्किंग स्टाफ भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल.

दहावी उत्तीर्णांना टपाल खात्यात नोकरीची संधी, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

इंटेलिजन्स ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. SA/MT पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण  असावेत तसेच त्यांच्याकडे कार ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. 

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय MTS पदांसाठी 27 वर्षांपेक्षा जास्त आणि SA/MT साठी 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 13 नोव्हेंबर 2023 पर्यंत वयाची गणना केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. आयबीने या भरतीसाठी 500 रुपये शुल्क आकारण्यात येणारआहे. सामान्य, EWS आणि OBC उमेदवार वगळता, इतर सर्व उमेदवारांना फक्त 50 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.

मुंबई विद्यापीठात विविध पदांची भरती, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

आयबीमधील विविध पदांसाठी अर्जाची प्रक्रिया शनिवार, 14 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यासाठी उमेदवार 13 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकणार आहेत. या कालावधीपूर्वी आणि नंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Related posts