trending news doraemon and nobit arrest by delhi police what they were doing

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Delhi Police Caught Doraemon Nobita: डोरेमॉन या जपानी कार्टुन मालिकाने जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. डोरेमॉन  (Doraemon) हे फुजिको-फुजियो यांनी लिहिलेली मांगा कादंबरी आहे. या कार्टुन मालिकेतील डोरेमॉन आणि नोबिता ही पात्र बच्चेकंपनीमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. डोरेमॉन हा एक रोबो मांजर आहे आणि नोबिताच्या (Nobita) मदतीसाठी तो बावीसव्या शतकातून एकविसव्या शतकात आलाय. पण नुकतंच डोरेमॉन आणि नोबिताला दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) अटक केली आहे. आता तुम्ही विचार करत असाल हे कसं शक्य आहे. ती दोघं तर कार्टुन पात्र आहेत. पण हे प्रत्यक्षात घडलं आहे

डोरेमॉन-नोबिताला अटक
वास्तविक डोरेमॉन आणि नोबिता नावाने ओळखले जाणारे दोन चोर असून दिल्ली पोलीस गेले अनेक दिवस त्यांच्या मागावर होते. दिल्ली पोलिसांनी सुभाष प्लेसजवळ एका तपासणीदरम्यान त्यांची दुचाकी थांबवली. यावेळी कागदपत्रात हे दोघं वॉन्टेड चोर असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. 

डोरेमॉनचं खरं नाव धर्मेंद असं असून तो दिल्लीतल्या शालीमार भागात राहाणारा आहे. धर्मेंद्र 25 वर्षांचा असून त्याने शाळा सोडून दिली आणि चोरीच्या मार्गाला लागला. ड्रग्ज तस्करीशीही त्याचं नाव जोडलं गेलं आहे. तर त्याचा साथीदार असलेला मोहित नोबिता नावाने ओळखला जातो, त्याचं वय 20 वर्ष आहे. मोहितने शिक्षण अर्धवट सोडून चोरी-लुटमार करतो. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी धर्मेंद्र उंचीला कमी असून गोलमटोल आहे, यामुळे तो डोरेमॉन नावाने ओळखला जातो. शिवाय पाकिटमारी करण्यात त्याचा हातखंडा आहे. सामान्य चेहरेपट्टी असलेला धर्मेंद्र सामान्य लोकांमध्ये सहज मिसळतो आणि हातसफाई करतो. तर नोबिता म्हणजे मोहित हा आरोपीदेखली भुरट्या चोऱ्या करण्यात पटाईत आहे. दोघांच्या खिशातही चाकू, ब्लेडसारखी शस्त्र असतात. गर्दीच्या ठिकाणी म्हणजे बाजार किंवा रेल्वे, बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत हे दोघं पाकिटमारी करत होते. त्यांच्याबाबत अनेक तक्रारी दाखल होत्या. पण पोलिसांच्या हाताला ते कधीही लागले नव्हते. 

हे ही वाचा :  विश्वचषकात विक्रम रचण्यापासून काही पावलं दूर, जसप्रीत बुमराह करणार ऐतिहासिक कामगिरी

 

ल्ली पोलिसांची कारवाई
धर्मेंद्र उर्फ डोरेमॉनच्या नावावर दिल्लीतल्या वेगवेगळ्या पोलीस स्थानकात अनेक गुन्हे दाखल आहेत. दिल्लीच्या सुभाष प्लेसजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी चोरीच्या बाईकवर जाताना पोलिसांनी या दोघांनी हेल्मेट घातलं नसल्याच्या कारणावरुन त्यांना अडवलं. पोलिसांनी त्यांना थांबवलं, पण या दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करुन दोघांना अटक केली. त्यांच्याविरोधात चोरीशी संबंधीत कलमं लावण्यात आली असून दिल्ली पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Related posts