लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून ‘या’ देशात होतोय महिलांचा व्यवहार; ‘तो’ Video मन विचलित करतोय

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral Video : मुली म्हणजे धनाची पेटी असं आपण मानतो. नवरात्रीचा उत्साह सुरु आहे. पण अजून ही ठिकाणी ती नकोशीच आहे. या देशात परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहे. त्यामुळे या देशात तरुणी असो किंवा वृद्ध महिला त्यांच्या तस्करी करण्यात येतं आहे. ही संताजनक आणि धक्कादायक घटना चीनमध्ये समोर आली आहे. चीनमधील धक्कादायक वास्तव सांगणारा एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या तरुणीचं सत्य ऐकून आपलं मन विचलित होतंय. (Women are being traded in this country because they dont get a girl for marriage selling women unmarried girls increasing in china video viral)

चीनमध्ये अनेक दिवसांपासून मुलींच्या तस्करीच्या प्रश्न मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आला आहे. यामागील दोन धक्कादायक कारणं ऐकून तर संताप व्हायला होतो. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी दीर्घकाळापासून सुरु असलेली एक मूल धोरण आणि त्यात मुलाचीच इच्छा. या मुळे आज चिनी तरुण वधू मिळत नाही आहे. त्यामुळे इथे आजूबाजूच्या देशांतून महिला आणि मुलींना विकत घेतलं जात आहे.

या धंद्यांतर्गत 25 हजार रुपये देऊन कुमारी मुलीला विकत घेतलं जातं आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गावातील सर्व पुरुष मुलीचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर बलात्कार करतात. हे कटू सत्य उत्तर कोरियातील येओनमी पार्क नावाच्या महिलेने जगासमोर उघड केलं आहे. तिने एका मुलाखतीदरम्यान या भयान वास्तवाचा पर्दाफाश केला आहे.

ती या मुलाखतीत म्हणाली की, उत्तर कोरियातील हुकूमशहा किम जोंग उन यांच्या राजवटीत त्यांना गुदमरल्यासारखे वाटायचं. म्हणून ती चांगल्या आणि शांत जीवनाच्या शोधात ती उत्तर कोरियातून चीनला पळून गेली होती. वाटलं होतं आता सगळं छान होणार. पण इथे सत्य पाहून खोल अंधारात गेल्यासारखं वाटलं. 

चीनमधील धक्कदायक वास्तव!

येओन्मीला वाटलं होतं की, उत्तर कोरियात नाही तर चीनमध्ये तरी तिचे आयुष्य चांगलं असले असं वाटलं होतं. पण चीनमध्ये त्यांची स्थिती उत्तर कोरियापेक्षाही वाईट होती. चीनमध्ये आल्यानंतर ती मानवी तस्करीच्या रॅकेटची शिकार झाली होती. तिथे तिचंच नाही तर तिच्या आईचं आयुष्यही मरण यातनेपेक्षा खराब झालं होतं. दलालांनी तिच्या आईला 8500 रुपयांना विकलं होतं. तर तिची 25 हजार रुपयांना विक्री झाली होती. 

4 कोटी पुरुषांना लग्नासाठी वधू मिळतं नाही

चीनमध्ये ‘एक अपत्य’ धोरणामुळे किमान 4 कोटी पुरुषांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहे. त्यामुळे गावात राहणाऱ्या पुरुष मुली विकत घेताना दिसत आहे.  ते मुली विकत घेतात आणि मरेपर्यंत त्यांच्यावर बलात्कार करतात. तिथले पुरुष मुलींना माणूस नसल्यासारखे वागवतात. येओन्मीच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तिने मुलाखतीत उघड केलेलं हे रहस्य ऐकून सोशल मीडियावर लोक थक्क होत आहे. तर हे सत्य जगासमोर आणल्याबद्दल अनेक यूजर्स येओनमीचं कौतुक करत आहेत. तर काही लोकांनी ती फुटेज मिळविण्यासाठी खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. 

 

Related posts