Pre-Wedding Photoshoot साठी कपलचं भलतंच धाडस, चक्क विषारी कोब्रा घेतला आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pre-Wedding Photoshoot With Cobra: आजकाल प्री विडिंग फोटो शूट ही काय नवीन गोष्ट नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्याला प्री-वेडिंग शूट करताना दिसते. त्यात कपल हे एक सेलिब्रिटी कपलसारखं फोटो शूट करतात. प्रत्येकव्यक्तीला वाटतं की आपल्या प्री-वेडिंगचं फोटो शूट काही वेगळं असलं पाहिजे. अशात प्रत्येकव्यक्ती एक नवीन कॉन्सेप्ट शोधताना दिसते. सध्या एक नवीन प्री-वेडिंग फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. त्याचं कारण म्हणजे त्या कपलनं हे फोटो शूट एका विषारी सापासोबत केलं आहे. तो साप म्हणजे कोब्रा. त्यांनी यावेळी जणू एक चित्रपटाची स्टोरी दाखवली आहे. 

या कपलचं हे फोटोशूट ट्विटरवर शेअर करण्यात आलं आहे. त्यांनी शेअर केलेले हे फोटो शूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. यावेळी त्यांनी 30 फोटो शेअर केले आहेत. हे पाहता त्यांनी एक स्टोरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या फोटोमध्ये ती मुलगी घराच्या बाहेर असलेल्या बॅकयार्डमध्ये जाताना दिसते. यावेळी तिला तिथे कोब्रा साप दिसतो. त्याला पाहून मुलगी घाबरते आणि लगेचच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जाऊन साप पकडणाऱ्या व्यक्तीला शोधते आणि तिथून त्याचा नंबर घेते. नंबर मिळाल्यानंतर ती लगेच त्यामुलाला फोन करते. 

त्यामुलीनं कॉल केल्यानंतर तो मुलगा त्वरीत तिथे स्कूटीवर पोहोचतो. त्यानंतर मुलगी त्या मुलाला सापाविषयी सांगते. हा मुलगा हीरो होत सापाला पकडतो. त्या सापाला पकडताच ती सापाला एका डब्ब्यात बंद करतो. त्या मुलानं केलेले हे काम पाहता ती मुलगी इम्प्रेस होते. तो साप घेऊन तर जातो पण तिला इशारा करून सांगतो की तिला कॉल करेल. त्यानंतर दोघांमध्ये चर्चा सुरु होते आणि अखेरीस ते दोघं हाथ पकडून चालत असताना मागच्या बाजुला साप असल्याचे दिसते. यातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की सापामुळे ते भेटले आणि आता ते सोबत आहेत. 

हेही वाचा : देशमुख – खान कुटुंबात इतकं खास नातं? अर्पितानं साजरा केला Riteish च्या मुलाचा वाढदिवस

या प्री-वेडिंग शूटच्या पोस्टवर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, नाग ने बना दी जोड़ी. दुसरा नेटकरी म्हणाला, आता पर्यंत करण्यात आलेलं सगळ्यात बेस्ट फोटोशूट. तिसरा नेटकरी म्हणाला, जहरीला प्यार. आणखी एक नेटकरी म्हणाल, बोलायचं काय आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, विचार करण्याच्या पलीकडे आहे.

या फोटोमध्ये वापरण्यात आलेला साप हा जिवंत आहे हे 100 टक्के बोलू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे आजकाल AI च्या मदतीनं असे फोटो बनवता येतात.

Related posts