करवाचौथच्या रात्री सेक्स करण्यास नकार, प्रियकराने तिला जागीच संपवलं, 6 महिन्यांनी घडलं भलतंच

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News In Marathi: करवाचौथ तिला तिच्या प्रियकरासोबत साजरी करायची होती. त्यासाठी ती त्याच्या घरीही गेली. मात्र, तो पूर्णपणे नशेच्या आहारी गेला होता. करवाचौथच्या रात्री त्याला प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. मात्र तिने त्याला नकार दिला. रागाच्या भरात त्याने प्रेयसीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर जे घडलं त्याने एकच सगळ्यांना एकच धक्का बसला. 

करवाचौथच्या दिवशी प्रेयसीसोबत जबरदस्ती करत असतानाच तिला जोरात धक्का मारला. त्याचवेळी तिचे डोके टेबलला आटपले आणि भळाभळा रक्त वाहायला लागले आणि काहीच वेळात तिचा मृत्यू झाला. रागाच्या भरात प्रियकरानेच तरुणीची हत्या केली. मात्र, शुद्धीत आल्यानंतर आपण हे काय करुन बसलो हे त्याला जाणवले. प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने कट रचला. त्याने घरातच 3 फुटाचा खड्डा खोदला आणि त्यात मुलीचा मृतदेह दफन केला. 

लखनऊ येथे 2020 साली ही घटना घडली होती. रुबी नावाच्या तरुणीचा तिच्या पतीसोबत घटस्फोट झाला होता. ती तिच्या आई आणि दोन मुलांसह राहत होती. करवाचौथच्या रात्री तिने तिच्या आईला सांगितले की ती तांत्रिकाला भेटायला जात आहे. संपूर्ण रात्र उलटून गेली तरी रुबी घरी परतली नाही म्हणून त्यांनी तांत्रिकाला फोन करुन चौकशी केली मात्र त्याने ती इथे आलीच नसल्याचे सांगितले. आठ दिवस उलटून गेल्यानंतरही रुबीचा काहिच पत्ता नसल्याने तिच्या आईने पोलीस स्टेशन गाठले. 

पोलिसांनी रुबीचे कॉल डिटेल तपासले तेव्हा कळले की रुबीचा एक प्रियकर आहे. मात्र, त्यानेही रुबीबद्दल काहीच सांगण्यास नकार दिला. रुबी जिवंत आहे की तिचा मृत्यू झालाय याचा काहीच पुरावा पोलिसांकडे नव्हता. मात्र, अचानक एके दिवशी रुबीचा प्रियकर  पोलिस ठाण्यात आला. त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याला रुबीची आत्मा दिसते ती मला जगून देणार नाही, असं तो वारंवार सांगत होता. त्यानंतर त्याने पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगून टाकला. करवाचौथच्या रात्रीच रुबीची हत्या करण्यात आली व त्याच खोलीत तीन फुट खड्डा खणून तिचा मृतदेह दफन करण्यात आला. 

पोलिसांनी आरोपीच्या खोलीत खोदकाम करताच तिथे एका मुलीचा सांगाडा सापडला. मुलीच्या हातात असलेल्या बांगड्यावरुन तिच्या आईने मृतदेहाची ओळख पटवली. आरोपीचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यानेच हत्येचा कबुलीजबाब दिला. 

Related posts