( प्रगत भारत । pragatbharat.com)
S Somnath vs K Sivan : भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. इस्रोचे विद्यमान प्रमुख डॉ. एस. सोमनाथ (S. Somnath) यांनी संस्थेचे माजी प्रमुख के. सिवन (K Sivan) यांच्यावर एक आरोप केला. दक्षिण भारतातील माध्यमांनी याबद्दलचं वृत्त दिल्यानंतर मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. मी इस्रोचा प्रमुख होऊ नये अशी सिवन यांची इच्छा होती, असा धक्कादायक दावा सोमनाथ यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हणजेच ‘निलावु कुडिचा सिम्हंल’ या (Nilavu Kudicha Simhanal) पुस्तकात केला आहे. त्याचबरोबर त्यांनी चांद्रयान-2 मिशन (Chandrayaan-2) फेल होण्यामागील खरं कारण देखील सांगितलं आहे. त्यांचं हे पुस्तक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेने ज्यावेळी सोमनाथ यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी सावध भूमिका मांडली. प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही संस्थेतील सर्वोच्च पदावर जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसा मलाही करावा लागला. सर्वांना आव्हानं पार करावं लागतं. पुस्तकात मी कोणावरही वैयिक्तिक टीका केलेली नाही. एखाद्या व्यक्तीविरोधात लिहिलेलं नाही, असं स्पष्टीकरण सोमनाथ यांनी दिलंय.
एखाद्या सर्वोच्च पदावर जाण्यासाठी अनेकजण पात्र असतात. मात्र, मला माझा मुद्दा मांडायचा होता. त्यामुळे कोणावरही मी टीका केली नाही, असा खुलासा सोमनाथ यांनी केलाय. त्यावेळी, घाई आणि गडबडीमुळे इस्त्रोचं चांद्रयान-2 मिशन फेल ठरलं, असंही सोमनाथ यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. चांद्रयान-2 च्या अपयशाची घोषणा करताना ज्या चुका झाल्या होत्या त्या लपल्या होत्या. जे काही घडत आहे ते त्याच पद्धतीने सांगितलं पाहिजे, असं मत देखील त्यांनी यावेळी मांडलं आहे.
आणखी वाचा – Crime News : गुगल अर्थच्या मदतीने पठ्ठ्यानं शोधून काढली चोरीला गेलेली कार, पोलिसांच्या डोक्याच्या भुगा!
दरम्यान, अपयशाचं सत्य लोकांसमोर मांडलं पाहिजे. त्यामुळे संस्थेमध्ये पारदर्शकता समोर येते, तसेच लोक त्यांच्या आव्हानांशी लढताना पुढे जाण्याची प्रेरणा घेऊ शकतात, असंही सोमनाथ यांनी म्हटलं आहे. मी माझ्या आयुष्यात आलेल्या आव्हानांबद्दल लिहिलंय, मला कोणालाही काही दोष देयचा नाही, असं सोमनाथ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता माजी चीफ आणि विद्यमान चीफ यांच्या छुपा संघर्ष होता का? असा सवाल आता विचारला जात आहे.