[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
WHO नुसार डायबिटीस घातक
WHO ने केलेल्या अभ्यासानुसार, २०१९ मध्ये डायबिटीस हा मृत होण्याच्या कारणांमध्ये ९ व्या स्थानावर आलेला आजार आहे. त्यामुळे हा अत्यंत घातक आजार असून याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. मात्र याची नक्की लक्षणे ओळखणे कधी कधी कठीण होते.
किती असते नॉर्मल रक्तातील साखरेची पातळी
शरीरात साखरेची पातळी असणे हे उर्जेचे स्रोत असते. त्यामुळे योग्य प्रमाणात साखर रक्तात असावीच लागते. खाण्यापूर्वी साधारण ब्लड शुगर ही 100 mg/dl इतकी असायला हवी तर मधुमेही रूग्णांची साखर ही 80-130 mg/dl इतकी असणे गरजेचे आहे. तर खाण्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण हे 140 mg/dl इतके हवे आणि मधुमेही रूग्णांसाठी हेच प्रमाण 180 mg/dl पेक्षाही कमी असणे गरजेचे आहे.
(वाचा – सकाळी उठल्यानंतर किती वेळात प्यावा चहा वा कॉफी, अन्यथा होईल असे नुकसान)
तोंडामध्येही दिसतात मधुमेहाची लक्षणे
हेल्थ एक्सपर्टनुसार, मधुमेहाची लक्षणे ही तोंडामध्येही दिसून येतात. मात्र याचे संकेत मिळत असूनही अनेकांना त्याची जाणीव होत नाही. बरेचदा याकडे दुर्लक्ष केले जाते आणि अचानक मधुमेह असल्याचे तपासणीनंतर जाणवते. मात्र याचे संकेत आधीच तुम्हाला मिळत असतात हे लक्षात घ्या.
(वाचा – नाभीमध्ये तेल घालणे किती ठरते फायदेशीर, कोणत्या आजारासाठी कोणत्या तेलाचा कराल वापर)
काय आहे पहिले लक्षण
तोंडामध्ये सतत कोरडेपणा जाणवणे आणि सतत तहान लागणे हे मधुमेह असण्याचे सर्वात पहिले लक्षण तोंडामध्ये जाणवते. तुमची जीभ कोरडी पडून तुम्हाला सतत तहान लागत असेल तर वेळीच तुम्ही तपासणी करून घ्यायला हवी.
(वाचा – उलटे चालण्याचे फायदे माहीत आहेत का? १५ मिनिट चालण्याने पोटावरची लटकलेली चरबी होईल गायब)
दुसरे महत्त्वाचे लक्षण
तोंडातून गोडसर वास येत राहणे अथवा कितीही स्वच्छता राखली तरीही तोंडातून दुर्गंध येत असेल तर हेदेखील डायबिटीसचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते. तसंच हे लक्षण उच्च रक्तदाब अथवा हायपोग्लायसिमियाचेदेखील असून शकते.
अन्य लक्षण
जास्त तहान लागणे, सतत लघ्वी होणे, थकवा असणे, दृष्टी कमी दिसणे, वजन अचानक कमी होणे आणि तोंडामध्ये पुळ्या येणे, जखम पटकन न भरणे हीदेखील अन्य लक्षणं आहेत आणि त्याचा त्रास होतो.
कसे ठेवाल नियंत्रण
डायबिटीसपासून लांब राहण्यासाठी साखरेवर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी हेल्दी डाएट फॉलो करून तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि रोज किमान ७ ते ८ तास पूर्ण झोप घ्या. ज्यामुळे थकवा राहणार नाही.
[ad_2]