( प्रगत भारत । pragatbharat.com)
Girl Became Rich by Begging: रस्त्याने जाताना वाटेत आपल्याला भिकारी दिसतात. काहींना भूक लागलेली असते, कोणाचे बाळ आजारी असते म्हणून त्यांना पैसे हवे असतात. आपणही दया दाखवून अनेकदा त्यांना पैसे दिले असतील. पैसे दिल्याचे समाधान आपल्याला मिळते. पण यातील काही भिकारी असेही आहेत जे भिकेचे पैसे घेऊन श्रीमंत झाले आहेत. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाकिस्तानी तरुणीचा असल्याचे सांगितले जातेय. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका चांगल्या घरातील एक सुंदर कपडे घातलेली मुलगी पाहू शकता, जी तिने स्वतःबद्दल सांगायला सुरुवात करताच तुम्ही थक्क व्हाल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुणी नम्रपणे बसलेली आहे. ती तिचे नाव लायबा असल्याचे सांगत आहे. एकूण 1 मिनिट 25 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये मुलगी अभिमानाने सांगत आहे की, तिने गेल्या पाच वर्षांत भीक मागून खूप पैसे कमावले आहेत. मला माझी ओळख लपवायची नाही आणि ती लपवता येत नसल्याने मी सत्य बोलत असल्याचे लायबा सांगते. ती लोकांना खोट्या गोष्टी सांगून पैसे मागत असे आणि लोक जास्त चौकशी न करता पैसे द्यायचे असेही ती आनंदाने सांगत आहे.
लायबा नावाची पाकिस्तानी तरुणी आता मलेशियामध्ये राहते. पाकिस्तान ते मलेशिया ती फ्लाइटने प्रवास करते. तिच्याकडे 2 फ्लॅट, कार आहे. ती पाकिस्तानात नातेवाईकांना भेटायला आली. भीक मागून आपण श्रीमंत झाल्याचे ती सांगते. भीक मागणाऱ्या लोकांना मी पाहायचे. ते भीक मागून श्रीमंत व्हायचे. मीदेखील हातात पुस्तक पकडून उभी राहायची असे ती सांगते. किंवा सर्वांना खोटी कहाणी सांगायचे, घरी कोणी आजारी आहे, उपचाराला पैसै नाहीत, असे सांगून पैसे मिळवायचे, असेही ती मुलाखतीत सांगत आहे.
Entrepreneurship in the neighbouring country! pic.twitter.com/zLkjvGFKug
— Shah Faesal (@shahfaesal) November 24, 2023
हा मनोरंजक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर @shahfaesal नावाच्या अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. ‘शेजारील देशातील उद्योजक’ असे कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 3 लाख लोकांनी तो पाहिला आहे आणि कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. पाकिस्तानमधील एका यूट्यूबरने त्याच्या चॅनलवर व्हिडीओ शेअर केला होता, त्याने मुलीची मुलाखतही घेतली होती.
मदत करणे ही वाईट गोष्ट नसली तरी योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखणेही महत्त्वाचे आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर डोळे झाकून सरसकट सर्वांना मदत करणाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली असेल.