Dev Deepawali 2023 : देव दिवाळीला दुर्मिळ भद्रावास योग! ‘या’ शुभ मुहूर्तावर धन वृद्धीसाठी करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dev Deepawali 2023 : दिवाळीनंतर येणारी देव दीपावली हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो. पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमेला (Kartik Pournima) देव दिवाळी साजरा करण्यात येते. हा सण खास करुन घाट परिसरात आणि वाराणसीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दिवे दिवाळीला अतिशय दुर्मिळ योग जुळून आला आहे. या दिवशी भद्रावास योगासोबत  3 शुभ योग जुळून आले आहेत. यादिवशी रवियोग, परिघ योग आणि शिवयोग असणार आहे. भद्रावास योगात केलेली उपासना थेट भगवान शंकरा चरणी पोहोचते आणि आपली सर्व इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. (bhadravas yoga is being created on Dev Deepawali or Dev Diwali 2023 Do this upay for wealth increase on this auspicious time)

कधी आहे देव दिवाळी?

कार्तिक महिन्याच्या शेवटचा दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्यात येते. यंदा कार्तिक पौर्णिमा म्हणजे देव दिवाळी रविवारी  26 नोव्हेंबर 2023 ला आहे. 

कार्तिक पौर्णिमा तिथी – 26 नोव्हेंबर (रविवार) दुपारी 3:53 वाजेपासून 27 नोव्हेंबर (सोमवार) ला दुपारी 2:45 वाजेपर्यंत 

देव दिवाळीचा शुभ मुर्हूत – संध्याकाळी 5:08 मिनिटांपासून 7:47 मिनिटांपर्यंत

भद्रवास योग आणि 3 शुभ संयोग वेळ!

देव दिवाळीला भद्रावास दुपारी 3:53 पासून दुपारी 3:16 वाजेपर्यंत असणार आहे. तर रवि योग सकाळी 06:52 वाजेपासून दुपारी 02:05 वाजेपर्यंत असणार आहे. तर परिघ योग पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत 12.37 पर्यंत आहे. त्यासोबतच शिवयोग दिवसभर असून कार्तिक पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत असणार आहे. 

देवदिवाळी का साजरी करतात?

पौराणिक कथेनुसार, देव दिवाळीच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता आणि देवांना स्वर्ग मिळवून दिला. त्यामुळे या दिवशी देव दिवाळी साजरा करतात असं म्हणतात. तर अजून एका आख्यिकानुसार भगवान विष्णूने या दिवशी मत्स्य अवतार धारण केला होता. म्हणून या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. असं म्हणतात देव दिवाळीला आर्थिक वृद्धीसाठी उपाय केल्यास त्याचे फळ प्राप्त होते. 

देव दिवाळीला ‘हे’ उपाय करा!

देव दिवाळीच्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावा. 

या दिवशी भगवान विष्णूला 11 तुळशीची पानं अर्पण करा.

या दिवशी गंगा स्नान करून दिवे दान केल्याने दहा यज्ञांच्या बरोबरीचं पुण्य प्राप्त होतं. 

घरात सकारात्मक ऊर्जा असावी म्हणून यादिवशी 11 तुळशीची पानं पिठाच्या डब्ब्यात ठेवून बाजूला ठेवा. 

आयुष्यातील संकट दूर व्हावं आणि जीवनात आनंद यावं म्हणून घरात भगवान सत्यनारायणाची कथा करावी. 

करिअरमधील प्रगतीसाठी देव दिवाळीच्या दिवशी तुळशीला पिवळ्या रंगाचं अपर्ण करा. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Related posts