( प्रगत भारत । pragatbharat.com)
What Is Electronic Interlocking: ओडिशामधील (Odisha) बालासोर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी बाहानगा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामागील (Odisha Train Accident) मुख्य कारण समोर आलं आहे. 288 प्रवाशांनी प्राण गमावलेला हा अपघात कसा झाला हे सांगताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममुळे (Electronic Interlocking System) अपघात झाल्याचं नमूद केलं. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये गडबड झाल्याने दुर्घटना झाल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. आधी ही इंटरलॉकिंग मानवी सहभागाने म्हणजेच मॅन्युअली केली जायची. मात्र आता हे लॉकिंग ऑटोमॅटीक पद्धतीने होतं. यामध्येच गडबड झाल्याने हा अपघात झाल्याचं रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
रेल्वेमंत्री काय म्हणाले?
“रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या ट्रेन अपघातासंदर्भातील तपास पूर्ण केला आहे. या अपघातामधील मुख्य कारण काय आहे याचा शोध लागला आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्याने हा अपघात झाला,” असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हणाले. या अपघासाठी जबाबदार असलेल्या लोकांची ओळख पटवण्यात आली असल्याचंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. मात्र रेल्वेमंत्र्यांनी ज्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचा उल्लेख केला ती यंत्रणा नेमकी असते तरी काय हे पाहूयात…
इंटरलॉकिंग म्हणजे काय?
रेल्वे स्थानकाजवळ अनेक रेल्वे लाइन्स म्हणजेच मार्गिका असतात. या मार्गिका एकमेकांना वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये जोडल्या जातात. यासाठी काही ठराविक पॉइण्ट्स निश्चित केलेले असतात. या पॉण्ट्सवरुन मार्गिका निश्चित केल्या जातात तिथे एका मोटरच्या आधारे रुळांची दिशा बदलली जाते. तर रेल्वे स्थानकांवरील सिल्गनलच्या माध्यमातून लोको पायलेटला ट्रेन स्थानकात आणण्यासंदर्भातील परवानगी दिली जाते किंवा नाकारली जाते. ट्रॅक लॉकिंग आणि सिग्नल्स या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न होऊन काम करतात. म्हणजेच ट्रॅकची लॉकिंग केल्यावर ट्रेन कोणत्या मार्गाने जाणार हे निश्चित झाल्यानंतर त्याच मार्गावरील सिग्नल या ट्रेनला दिले जातात. या संपूर्ण यंत्रणेला सिग्नल इंटरलॉकिंग असं म्हणतात. सिग्नल इंटरलॉकिंगच्या माध्यमातून ट्रेन सुरक्षित मार्गाने प्रवास करेल हे सुनिश्चित केलं जातं.
#WATCH | The commissioner of railway safety has investigated the matter and let the investigation report come but we have identified the cause of the incident and the people responsible for it… It happened due to a change in electronic interlocking. Right now our focus is on… pic.twitter.com/UaOVXTeOKZ
— ANI (@ANI) June 4, 2023
ट्रेनचे ट्रॅक्स कसे असतात आणि लूप लाइन म्हणजे काय?
इंटरलॉकिंगचा अर्थ सांगण्याआधी ट्रेनच्या ट्रॅक्सची रचना लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ट्रेनचे सामान्यपणे दोन ट्रॅक असतात एक मेन ट्रॅक. यामध्ये अप आणि डाऊन असे विरुद्ध दिशेला जाणारे ट्रॅक असतात. तर तिसरा प्रकार असतो हा लूप लाइन. ही अतिरिक्त राखीव लाइन असते ज्यावर ट्रेन्सची अधिक वरदळ असताना एखाद्या ट्रेनला तात्पुरता थांबा दिला जातो किंवा या अतिरिक्त मार्गाने ट्रेन पुढे मार्गक्रमण करते. रस्ते वाहतुकीमध्ये ज्यापद्धतीने बायपास रोड काम करतात तसेच हे लूप ट्रॅक रेल्वेमध्ये काम करतात. आता इंटरलॉकिंगमध्ये जर ट्रेनला लूप लाइनचा ट्रॅक सेट करण्यात आला असेल तर मेन लाइनचे सिग्नल्स दाखवले जात नाही. तर या उलट ट्रेन मेन लाइनवरुनच जाणार असेल तर तिला लूप लाइनवरील सिग्नल दाखवले जात नाहीत.
This is how a track switch directs train to mainline or another line (loop line in this case). pic.twitter.com/j79D8B528g
— Chinmay Agarwal (@gulabi_angrez) June 3, 2023
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये काय होतं?
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इंटरलॉकिंग ही रेल्वेमधील सिग्नल यंत्रणा योग्यरितीने काम करावी म्हणून कार्यन्वयित असलेली यंत्रणा आहे. या इंटरलॉकिंगच्या माध्यमातून ट्रेन्सला रेल्वे स्थानकांमधून आणि यार्डांमधून सुरक्षितपणे मार्ग मोकळा करुन दिला जातो. सध्या ट्रेन्ससाठी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रो-मेकॅनिकल इंटरलॉकिंगसारखी आधुनिक सिग्नलिंग सिस्टीम वापरता आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ही आधुनिक यंत्रणा असून पारंपारिक म्हणजेच मानवी सहभागाने करण्यात येणाऱ्या इंटरलॉकिंगपेक्षा ही अधिक सुरक्षित मानली जाते. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये इंटरलॉकिंग नेमकं कुठे आणि कसं करायचं हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून निश्चित केलं जातं. ही एक प्रोसेस बेस सिस्टीम आहे. मात्र यामध्ये फेरफार करणं शक्य आहे.
नक्की वाचा >> Odisha Train Accident: घटनास्थळाच्या पहाणीनंतर मोदींनी लगेच कोणाला केला फोन? कॉलवर नेमकी काय चर्चा झाली?
ओडिशा अपघातात नेमकं काय घडलं?
बालासोरमधील भीषण अपघात झाला त्यावेळेस तिन्ही ट्रेन नेमक्या कोणत्या ट्रॅकवर होत्या हे समोर आलेल्या ट्रॅकिंग सिस्टीम चार्टमध्ये दिसत आहे. अपघात झाला त्यावेळी ‘अप लाइन’ ट्रॅकवर शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरामंडल एक्सप्रेस येत होती अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. तर या ट्रॅकच्या बाजूच्या ‘डीएन मेन’ ट्रॅकवरुन बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस जाणार होती. कोरामंडल एक्सप्रेस ट्रॅकवरुन घसरली आणि बाजूच्या ट्रॅखवरील मालगाडीला या ट्रेनचे घसरलेले काही डब्बे धडकले. तर काही डब्बे बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस येत असलेल्या ‘डीएन मेन’ ट्रॅकवर पडले. त्यामुळेच अत्यंत वेगाने येणाऱ्या बंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस याच ट्रॅकवर पडलेल्या कोरामंडल एक्सप्रेसच्या डब्ब्यांना धडकली. या डब्ब्यामधील अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला.
नक्की वाचा >> ट्रेन अपघातानंतर विमान कंपन्यांकडून मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार; तिकीट दरात अभूतपूर्व वाढ
कोरामंडल एक्सप्रेस लूप ट्रॅकवर गेली?
कोरामंडल एक्सप्रेसचं इंजिन थेट मालगाडीच्या डब्ब्यावर चढल्याचं दिसत असल्याने काही तज्ज्ञांनी कोरामंडल एक्सप्रेस थेट मालगाडीला धडकल्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा अपघात ‘लूप लाइन’मध्ये घडल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘लूप लाइन’ हा राखीव ट्रॅक असतो. एकाच वेळी येणाऱ्या आणि जाणाऱ्या ट्रेन्सची संख्या अधिक असते तेव्हा काही ट्रेन्सला ‘लूप लाइन’वरुन काही अंतरासाठी मार्ग मोकळा करुन दिला जातो किंवा ही लाइन मालगाड्यांसाठी तात्पुरती साईडींग ट्रॅक म्हणून वापरली जाते. याच लाइनवर उभ्या असलेल्या मालगाडीला कोरामंडल एक्सप्रेस थेट धडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये झालेल्या गोंधळामुळे कोरामंडल एक्सप्रेस लूप लाइनला गेली आणि हा अपघात घडल्याचं आता सांगितलं जात आहे.