( प्रगत भारत । pragatbharat.com)
Corona JN.1: कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसतेय. अशातच आता JN.1 या नवीन सब व्हेरिएंटमुळे लोकांच्या मनात घबराट पसरलीये. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 752 नवीन रुग्ण आढळलेत. अशावर आता डब्ल्यूएचओने म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केलीये. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, गेल्या 4 आठवड्यांमध्ये जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत 52 टक्क्यांनी वाढ झालीये.
या काळात 8 लाख 50 हजार नवीन रुग्णांची नोंद झालीये. नवीन मृत्यूच्या संख्येतही गेल्या 28 दिवसांच्या तुलनेत 8 टक्क्यांनी घट झालीये. मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर 1600 हून अधिक रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत.
कोरोनाच्या वाढत्या रूग्णांनी चिंता वाढली
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या सातत्याने वाढणाऱ्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केलीये. WHO च्या म्हणण्यानुसार, ते नवीन प्रकरणांबाबत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वाढत्या केसेसबाबत सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे.
सिंगापूरमध्ये कोरोनाचा हाहाकार
जगभरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून सिंगापूरमध्ये सर्वात वाईट परिस्थिती पाहायला मिळतेय. सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. या ठिकाणी मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं असून लोकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात येतोय.
देशात वाढतोय कोरोनाचे रूग्ण
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारीपर्यंत अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण कोविड-19 रुग्णांची संख्या 4.50 कोटी (4,50,07,964) आहे. देशात गेल्या 24 तासात संसर्गामुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांची संख्या 5,33,332 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 752 नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,420 वर पोहोचली आहे