transport drivers strike shortage daily needs milk food que at petrol pumps

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Transport Strike: देशासह राज्यभरातले पेट्रोल आणि डिझेल पंपावर इंधन पुरवठा करणारे टँकर चालक (Truck Drivers) कालपासून संपावर गेलेत. या संपामुळं पेट्रोल आणि डिझेल टंचाईची शक्यता आहे. राज्यात सर्वत्र ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) भरण्यासाठी वाहनचालकांची गर्दी झालीय. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रेलियम, इंडियन ऑईल या इंधन कंपनीच्या प्रशासनानं टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची भेट घेत संप मागे घेण्याची विनंती केली.  मात्र वाहतूकदार संपावर ठाम राहिले. संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आता पोलीस आणि आरटीओ प्रशासनानं दिलाय.

संपावर ट्रक चालक ठाम
ट्रक चालकांसाठी केलेल्या नव्या नियामुळे (Hit and Run new Law) देशभरातील ट्रक चालकांनी चक्का जाम आंदोलन सुरु केलं आहे. नव्या नियमानुासर हिट अँड रन प्रकरणात (Hit and Run Case) आता वाहन चालकाला 10 वर्षांची शिक्षा आणि 7 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. या नियमाविरोधात देशभरातील ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. 

भाजीपाला, फळं महागली
वाहतूकदारांच्या संपाचा मुंबईकरांना फटका बसू लागलाय. कालपर्यंत मुंबईत भाज्यांची वाहतूक सुरुळीत होती. मात्र आज या संपाचा परिणाम मुंबईतील बहुतांश भाजी मार्केटमध्ये दिसू लागलाय. भाज्यांची आवक घटल्यानं भाज्यांच्या किंमती दुपटींनी वाढल्यात. त्यामुळे ग्राहकांनीही बाजाराकडे पाठ फिरवलीय. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटलीय. आज फक्त 462 गाड्यांची आवक झालीय. परराज्यातून येणाऱ्या भाजीपाला आज मार्केटमध्ये आलाच नाही. कांदा, बटाट्यासह मटार आणि गाजरची देखील आवक घटलीय. आवक घटल्यानं भाजीपाल्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

पेट्रोल पंपावर वाहनचालकांची गर्दी
इंधन चालकांनी पुकारलेल्या संपाचा थेट परिणाम आता मुंबईत दिसून येतोय. पूर्व उपनगरामध्ये आज दिवसभर इतकाच इंधन साठा पेट्रोल पंपावर उपलब्ध आहे. त्यामुळे जर बुधवारपर्यंत संप मिटला नाही तर इंधनाचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे इंधन भरण्यासाठी मुंबईकरांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केलीय..

स्कूलबस बंद ठेवण्याच निर्णय
इंधन टँकर चालकांच्या संपाचा शालेय विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. संपामुळे अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध होत नसल्याने स्कूलबस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतलाय. पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नसल्याने स्कूल बसेस रस्त्यावर धावणार नाही, असं स्कूल बस मालकांनी सांगितलंय.केंद्र सरकारने रस्ते अपघात कमी करण्यासाठी कठोर कायदा केलाय. या हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या सुरू केलेल्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यताय.

लांब पल्ल्याच्या एसटी रद्द
ट्रक चालकांच्या संपाचा फटका गोंदियातील बससेवेला बसला आहे. गोंदियात एसटी बस महामंडळानं लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. कालपासून या गाड्या बंद आहेत.. केवळ गोंदिया ते नागपूरपर्यंतच बससेवा सुरू आहे. आगारात केवळी 19 हजार लीटर डिझेल उपलब्ध आहे. दररोज 4 हजार लीटर डिझेल लागते. मात्र शनिवारपासून डिझेलचा पुरवठा झाला नाही. कमी पल्ल्याच्या गाड्यांना पुरेल इकाचा डिझेलसाठा उपलब्ध आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या बंद असल्यानं प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. 

चंद्रपूर जिल्ह्यात हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी चक्काजाम केलाय. चंद्रपूर शहराच्या बंगाली कॅम्प चौकात रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे छत्तीसगड आणि तेलंगणात जाणारी वाहतूक विस्कळीत झालीय. हिट अँड रन कायदा मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केलीय. मागणी मान्य होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केलाय.

Related posts