( प्रगत भारत । pragatbharat.com)
Paush Amavasya Upay : पौष महिना हा पूर्वजांना समर्पित महिना म्हणून ओळखला जातो, म्हणून याला छोटे श्राद्ध पक्ष असंही म्हणतात. पौष महिन्यात या वर्षातील पहिली अमावस्या (Paush Amavasya) असणार आहे, त्या दरम्यान पितरांना प्रसन्न करता येतं. पौष महिन्यातील अमावस्या तिथी 10 जानेवारी रोजी रात्री 8.10 वाजता सुरू होईल. जो दुसऱ्या दिवशी 11 जानेवारीला संध्याकाळी 5:26 वाजता संपेल. पौष अमावस्येला काही विशेष कर्म केल्याने यमलोकातील पितरांच्या यातनांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता (Paush Amavasya Significance) आहे. पौष अमावस्येला काय करावं ते जाणून घेऊया…
दानधर्म करा
योग्य व्यक्तीला दिलेले दान कीर्ती, यश आणि सौभाग्य सोबत निश्चित फळ देते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पौष अमावस्येला अन्न, तांदूळ, दूध, तूप, घोंगडी, धन दान करावे. पितृदोषामुळे जीवन संकटांनी घेरले जाते, पण अमावस्येला केले जाणारे श्राद्ध विधी त्यातून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे.
गंगाजल स्नान
पौष अमावस्येला गंगा नदीत किंवा घरात गंगाजल टाकून स्नान करावे. याचा परिणाम आरोग्यावर होतो. पितरांसाठी नैवेद्य दाखवावा. त्यामुळे घरात सुख समाधान मिळतं, अशी मान्यता आहे.
श्राद्ध कधी घालाल?
पितरांचे श्राद्ध करण्यासाठी सकाळी 11.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंतचा काळ सर्वोत्तम मानला जातो. असे मानले जाते की अमावस्येला दुपारी पूर्वज त्यांच्या वंशजांमध्ये येतात आणि त्यांच्याकडून पाणी आणि अन्न मिळण्याची आशा करतात. अशा स्थितीत यावेळी केलेले श्राद्ध सात पिढ्यांतील पितरांना तृप्त करते. पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो.
पिंपळाला पाणी घाला
अनेक वेळा पितृदोष किंवा पितरांच्या नाराजीमुळे कुटुंबाची प्रगती थांबते आणि शुभ कार्यात अडथळे येऊ लागतात. अशा स्थितीत पौष अमावस्येला पाण्यात दूध, तांदूळ आणि काळे तीळ मिसळून पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा. यामुळे जीवनातील अंधार नाहीसा होतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)