( प्रगत भारत । pragatbharat.com)
PM Modi 11 Day Anushthan : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा 22 जानेवारीला होणार आहे. रामाची प्राणप्रतिष्ठापणा होईपर्यंत 11 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी एक विशेष अनुष्ठान करणार आहे. या अनुष्ठानची सुरुवात नाशिक काळाराम मंदिर पंचवटी इथून करण्यात आली आहे. या विशेष अनुष्ठानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अष्टांग योगातील यम नियमांचं पालन करणार आहेत. काय आहे हे अनुष्ठान आणि काय आहे अष्टांग योगामधील यम योगाचे नियम या सर्वांबद्दल आपण जाणून घेणार आहेत. (PM Modi 11 Day Anushthan modi will follow the Yam principles of Ashtanga Yoga what is the Yama principle)
अयोध्या में रामलला की प्राण प्रतिष्ठा में केवल 11 दिन ही बचे हैं।
मेरा सौभाग्य है कि मैं भी इस पुण्य अवसर का साक्षी बनूंगा।
प्रभु ने मुझे प्राण प्रतिष्ठा के दौरान, सभी भारतवासियों का प्रतिनिधित्व करने का निमित्त बनाया है।
इसे ध्यान में रखते हुए मैं आज से 11 दिन का विशेष…
— Narendra Modi (@narendramodi) January 12, 2024
अष्टांग योगाचे किती प्रकार?
योगा ही शतकानुशतके जुनी परंपरा आजही प्रचलित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतिक स्तरावर बहुमान मिळवून दिला आहे. योग हा प्राचीन काळापासून ऋषीमुनी आणि तपस्वींनी यांनी अंगिकारला असून वेदांमध्येही त्याचा उल्लेख दिसून येतो. योगाच्या प्रसिद्ध पुस्तक ‘पातंजलयोगदर्शन’ यामध्ये योगाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकानुसार अष्टांग योग म्हणजे मनातील अज्ञानाचा प्रवाह स्थिर करून ज्ञानप्रवाहाकडे नेणारा मार्ग. या अष्टांग योगाचे आठ योग असून त्यातील पहिलं यम, दुसरं नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे आहेत.
‘यम’ योगा म्हणजे काय?
यम नियम म्हणजे जो माणसाला समाजात नैतिकतेने जगायला शिकवतो, असा होतो. यम हा मूळ शब्द यम उपरमे पासून आला असून याचा अर्थ निवृत्त होणे असा होतो. या यम योगाचेही पाच नियम सांगण्यात आले आहेत.
पहिला नियम
अहिंसा- अहिंसाप्रतिष्ठायांतत्सन्निधौ वैरत्याग: ॥पातंजलयोगदर्शन 2/35॥
विनाकारण कोणाला इजा करणे यालाच हिंसा असं म्हटलं जात. अशा परिस्थितीत कोणाचेही नुकसान कधीही मनापासून, शब्दाने आणि कृतीने न करणे याचा प्रयत्न केला पाहिजे. शब्दांद्वारे असो, शारीरिक किंवा मानसिक इजा कोणाला करु नयेत. या यमाचा योगाच्या पहिला नियमाला अहिंसा असं म्हटलं जातं.
दुसरा नियम
सत्य- सत्यप्रतिष्ठायां क्रियाफ़लाश्रययत्वम् ॥पातंजलयोगदर्शन 2/36॥
मनाने, वाणीने आणि कृतीने सत्याचे अनुसरण करणे आणि असत्याचा त्याग करणे याला ‘सत्य’ असं संबोधल जातं. जे काही काम तुम्ही खऱ्या मनाने कराल त्याचं उत्तम परिणाम तुम्हाला मिळतात अशी मान्यता आहे.
तिसरा नियम
अस्तेय- अस्तेयप्रतिष्ठायां सर्वरत्नोपस्थानम् ।।पातंजलयोगदर्शन 2/37।।
अस्तेय म्हणजे मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष नसणे असा होतो. जेव्हा तुम्हाला तुमच्या मनानं, वाणीनं आणि कृतीतून कोणत्याही गोष्टीचं उल्लंघन करायचं नाही. अनैतिक मार्गाने कोणाकडूनही त्याची विशेष मालमत्ता मिळवायची नाही, तेव्हा ते ‘अस्तेय’ आहे, असं होतो.
चौथा नियम
ब्रह्मचर्य- ब्रह्मचर्यप्रतिष्ठायां वीर्यलाभ: ।।पातंजलयोगदर्शन 2/ 38।।
ब्रह्मचर्याबद्दल अनेकांचा भ्रमनिरास असून त्यांना असे वाटते की ब्रह्मचर्य म्हणजे कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध न ठेवणे असा होतो. पण योगदर्शनातील पुराण आणि यम-नियमानुसार ब्रह्मचर्यचा अर्थ यापेक्षा खूप वेगळा सांगण्यात आला आहे.
ब्रह्मचर्य म्हणजे मन, शब्द आणि कृतीत लैंगिक संयम किंवा संभोगाचा त्याग असा होतो. शास्त्रात आपण शरीराच्या इंद्रियांद्वारे बोलतो, पितो, पाहतो किंवा करतो असं सांगण्यात आलं आहे. जेवढं आवश्यक आहे तेवढेच वापरणं अशा स्थितीत इंद्रियांना कशाचेही व्यसन होऊ न देणे याला खऱ्या अर्थाने ब्रह्मचर्य असं म्हणतात.
शेवटचा नियम
अपरिग्रह- अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथन्तासंबोध ।।पातंजलयोगदर्शन 2/ 39।।
स्वतःच्या स्वार्थासाठी संपत्ती आणि भौतिक उपभोग यामध्ये संयम न ठेवणे हा परिग्रह असतो. तर त्याचा अभाव म्हणजे अपरिग्रह असं म्हटलं जात. अपरिग्रह सांगतो की अष्टांग योग करणार्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त काही जमा करू नयेत. पैसा किंवा भौतिक वस्तू जमा करता येत नाही.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)