अ‍ॅडल्ट स्टारने मृत्यूपूर्वी पॉर्न इंडस्ट्रीबाबत केले धक्कादायक खुलासे

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अ‍ॅडल्ट फिल्म स्टार थायना फिल्ड्स (Thaina Fields) काही दिवसांपूर्वी पेरु येथील आपल्या घरी मृतावस्थेत सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मृत्यूपूर्वी 24 वर्षीय थायनाने पॉर्न इंडस्ट्रीबाबत काही मोठे खुलासे केले होते. थायनाने सार्वजनिकपणे इंडस्ट्रीत होणाऱ्या अत्याचारांचा उल्लेख करत आपले अनुभव सांगितले होते. दरम्यान तिच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

थायना फिल्ड्स कोण आहे?

थायना फिल्ड्स ही पेरुमधील प्रसिद्ध अ‍ॅडल्ट स्टार होती. ती Chinita या नावाने ओळखली जात होती. थायना अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठं नाव झालं होतं. 

थायना फिल्ड्सने Chupetin Trujillo या कार्यक्रमाच्या माध्यमातून पेरुव्हियन मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर तिने अ‍ॅडल्ट कंटेंट तयार करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या  मिलि पेरू या प्रोडक्शन कंपनीशी हातमिळवणी केली होती.

थायना फिल्ड्सने आपल्या चिंता आणि त्यासाठी लागणाऱ्या मानसिक मदतीबद्दल भाष्य केलं होतं. “आपल्या सर्वांना ट्रॉमाचा सामना करावा लागतो. मला डिस्टिमिया आणि ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डरने ग्रासले आहे, मला मनोविकार आहे आणि मी झोपण्यासाठी गोळ्या घेते. थेरपी आणि औषधोपचारामुळे मला बरं होण्यास मदत झाली आहे,” असं तिने एका निवेदनात सांगितल्याचं वृत्त द सनने दिलं होतं. याशिवाय तिने आपल्या मृत्यूच्या 8 महिन्यांपूर्वी इंडस्ट्रीत होणाऱ्या लैंगिक अत्याचारावरही भाष्य केलं होतं. 

तिने काय आरोप केले होते?

थायना फिल्ड्सने खुलासा केलं होता की, “मी फार कणखर आहे. मी याविरोधात कोणालाही नोटीस न पाठवण्याचं ठरवलं होतं. मी अ‍ॅडल्ट कंटेंट निर्मिती सुरु केल्यापासून लैंगिक अत्याचाराचा सामना करत आहे. सुरुवातीला मला वाटलं की, त्यांनी मला काम दिलं असल्याने ते काही करु शकतात. पण मी घऱी आल्यानंतर आंघोळ करायची आणि रडायचे”.

पुढे तिने सांगितलं होतं की, “त्याने मला जास्त विचार न करण्याचा आणि कणखर होण्याचा सल्ला दिला होता. हे अनेक वेळा झालं. तुमचा समाज इतका वाईट असताना एका महिलेसाठी अ‍ॅडल्ट कंटेंट तयार करणं फार कठीण असतं”.

Related posts