[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
दुपारी व्यायाम
डायबिटीज केअर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात मधुमेही रुग्णांना दिवसातून एका वेळी व्यायाम केल्याने होणाऱ्या फायद्यांविषयी सांगण्यात आले आहे. या अभ्यासात संशोधकांनी सांगितले आहे की, दुपारी व्यायाम केल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी योग्यरित्या नियंत्रित करण्यात मदत होते.
तज्ज्ञ काय म्हणतात
आपण एक्सरसाइज करताना ठराविक वेळ ठरणे महत्वाचे असते. तसेच दुपारच्या वेळी केली जाणारी एक्सरसाइज ही सकाळच्या एक्सरसाइजपेक्षा अधिक प्रभावशाली आहे. अभ्यासात या गोष्टी समोर आल्या आहेत. दुपारी न झोपता केलेली ऍक्टिविटी अधिक फायदेशीर असल्याचं सांगण्यात येतं. यामुळे टाइप २ चा डायबिटिस कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
2000 हून अधिक लोकांवर केलेला अभ्यास
संशोधकांच्या टीमने 2400 लोकांवर हा अभ्यास केला आणि एक ते चार वर्षांच्या त्यांच्या शारीरिक डेटाचे पुनरावलोकन केले. हे सर्व लोक लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेहासारख्या आजारांना बळी पडले होते. या अभ्यासात सहभागी असलेल्या सर्व लोकांच्या शारीरिक हालचालींचे मोजमाप करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरण परिधान केले गेले.
कोणते व्यायाम फायदेशीर
संशोधकांनी शोधून काढले की, जे लोक दुपारी चालणे, नृत्य करण्यापासून ते धावणे आणि सायकल चालवण्यापर्यंतच्या ऍक्टिविटी करतात. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी एक वर्षानंतर लक्षणीय घटली. त्याचबरोबर दुपारच्या वेळी व्यायाम करणाऱ्या लोकांमध्येही शुगर कंट्रोल करणाऱ्या औषधांचा वापरही कमी होतो.
काय कारण आहे
दुपारच्या व्यायामामुळे रक्तातील साखर का कमी होते याचे कारण अद्याप कळलेले नाही. तुमची झोपेची पद्धत, तुमचा आहार आणि चयापचय यामागे संबंधित कारणे असू शकतात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या सगळ्यामागील थेट कारण शोधण्यासाठी इतर घटकांवरही संशोधन करण्याची गरज असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]