( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mumbai Local Train Mega Block: मुंबई रेल्वेच्या उपनगरी रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक कामे असल्याने येत्या रविवारी म्हणजेच 28 जानेवारी रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर माटुंगा-मुलुंडदरम्यान अप तसेच डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरही चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप तसेच डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे आहे मेगाब्लॉक – माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर
किती वाजता – सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत असणार मेगाब्लॉक
परिणाम – मेगाब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाऊन जलद मार्गावर वळण्यात येतील. ठाण्यातून सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावरुन धावतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा या लोकल वळवल्या जातील.
हार्बर मार्ग
कुठे आहे मेगाब्लॉक – पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर
किती वाजता – सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 दरम्यान
परिणाम – मेगाब्लॉक कालावधीमध्ये पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल आणि सीएसएमटीकडून पनवेल तसेच बेलापूरला जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेलवरुन ठाण्यासाठी सुटणाऱ्या आणि ठाण्यावरुन पनवलेसाठी सुटणाऱ्या लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत. मेगाब्लॉकच्या 5 तासांच्या कालावधीमध्ये सीएसएमटी आणि वाशीदरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वे
कुठे आहे मेगाब्लॉक – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, अप-डाऊन धीम्या मार्गावर
किती वाजता – सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान
परिणाम – मेगाब्लॉकदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन मार्गावरील काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्यात.