( प्रगत भारत । pragatbharat.com)
Bigg Boss 17 : ‘बिग बॉस 17’ मध्ये आयशा खाननं वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. त्यावेळी ती मुनावर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड असल्याचं सांगण्यात आलं होतं. या शोमध्ये आल्यानंतर तिनं मुनावर फारुकीवर अनेक आरोप केले. त्यापैकी एक म्हणजे त्यानं तिची फसवणूक केली होती. तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तो दोन मुलींना डेट करत होता. आता शोमधून बाहेर आल्यानंतर आयशानं आणखी एक खुलासा केला आहे. वयाच्या 9 व्या वर्षी तिचा विनयभंग झाल्याचे म्हटलं जात होते.
‘सिद्धार्थ कनन’ला दिलेल्या मुलाखतीत आयशानं हा खुलासा केला आहे. आशानं सांगितलं की ‘त्यांनी मला आवाज दिला. मी वळले आणि मी विचारलं की हा काका बोला. त्यांनी म्हटलं इथे ये. मी गेले. त्यांनी मला विचारलं की हा पत्ता कुठे आहे. मी म्हटलं हो मला माहितीये. ती बिल्डिंग आहे. ते म्हणाले की बेटा मला तिथे पोहोचवशील. मी लगेच म्हटलं हो, चला ठीक आहे. काही हरकत नाही. आम्ही त्या बिल्डिंगमध्ये गेलो, तिथे पहिल्या माळ्यावर मी त्यांना घेऊन गेले. पहिल्या माळ्यावरून जेव्हा आम्ही खाली उतरत होतो. तेव्हा त्यांनी मला शिड्यांवरून धक्का दिला. मग त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करणं सुरु केलं. त्यावेळी मला काही कळंत नव्हतं की नक्की काय होतंय.’
Ayesha Khan breaks down while talking about how she was molested at a young age. pic.twitter.com/Hmt1PUXayv
— #BiggBoss_Tak (@BiggBoss_Tak) January 27, 2024
पुढे याविषयी सविस्तर सांगत आयशा म्हणाली, ‘असं होतं की मला कळंत होतं की जे होतंय ते चुकीचं होतंय, पण काय होतंय हे कळत नव्हतं. एका 9 वर्षांच्या मुलीला काय कळत असेल. मी ओरडू शकत नव्हती. मी काहीच करू शकली नाही. त्यांचा हात माझ्या तोंडावर होता आणि ते मला थांबवत होते. मी फक्त पूर्णवेळ हेच बोलत होती की माझी आई तिथे उभी आहे, काका प्लीज मला जाऊ द्या. माझी आई तिथे उभी आहे. माझी आई तिथे उभी आहे.’
हेही वाचा : ‘या’ एका चुकीमुळे हृतिकच्या ‘फायटर’चे 60 ते 80 कोटींचं नुकसान!
पुढे आयशा म्हणाली, ‘मी सतत बोलत होते मात्र, त्यांनी मला सोडलं नाही. मग अचानक देवाच्या कृपेनं त्यांच्या डोक्यात काय आलं काय माहित आणि ते म्हणाले की तू इथंच थांब, मी फक्त दोन मिनिटात आलो. ते जसे बाहेर पडले, मी त्यांना जाताना पाहिलं आणि मी स्वत: ला म्हणाली आयशा इथून पळ.’