( प्रगत भारत । pragatbharat.com)
Bharat Ratna: देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून संबोधला जाणाऱ्या भारतरत्न पुरस्कारासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच नरसिंह राव, एन.एस स्वामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली आहे.
माजी पंतप्रधान आणि जाट नेता चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव, हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींची ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.
It is a matter of immense joy that the Government of India is conferring the Bharat Ratna on Dr. MS Swaminathan Ji, in recognition of his monumental contributions to our nation in agriculture and farmers’ welfare. He played a pivotal role in helping India achieve self-reliance in… pic.twitter.com/OyxFxPeQjZ
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2024
देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करणे हे आमचे सौभाग्य असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
हमारी सरकार का यह सौभाग्य है कि देश के पूर्व प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह जी को भारत रत्न से सम्मानित किया जा रहा है। यह सम्मान देश के लिए उनके अतुलनीय योगदान को समर्पित है। उन्होंने किसानों के अधिकार और उनके कल्याण के लिए अपना पूरा जीवन समर्पित कर दिया था। उत्तर प्रदेश के… pic.twitter.com/gB5LhaRkIv
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2024
त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी हा सन्मान आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे अधिकार आणि कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या चौधरी चरण सिंह यांनी गृहमंत्री म्हणून राष्ट्र निर्माणाला गती मिळवून दिली. आणीबाणीच्याविरोधात ते खंबीरपणे उभे राहिले. आमच्या शेतकरी बांधवांसाठी त्यांचे समर्पण, आणिबाणीवेळी लोकशाहीसाठी त्यांची प्रतिबद्धता देशाला प्रेरणा देणारी असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधानांनी यावेळी दिली.

Delighted to share that our former Prime Minister, Shri PV Narasimha Rao Garu, will be honoured with the Bharat Ratna.

As a distinguished scholar and statesman, Narasimha Rao Garu served India extensively in various capacities. He is equally remembered for the work he did as… pic.twitter.com/lihdk2BzDU
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2024