( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ganesh Jayanti 2024 : हिंदू धर्मात तिळाला अतिशय महत्त्व आहे. काळे तीळ आणि पांढरे तिळ याला विशेष महत्त्व असून मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तिळाला अधिक महत्त्व दिलं जातं. पौष महिन्यात सुरु मकर संक्रातीचा हा सण रथसप्तमीला समाप्त होतो. त्यानंतर माघ महिन्यातील येणारी पहिली विनायकी चतुर्थी (Vinayaka chaturthi 2024) अतिशय खास असते. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असं म्हणतात. या यादिवशी गणरायाला तिळाचं नैवेद्य दिलं जातं. तर याच दिवशी माघी गणेशोत्सव म्हणजे गणेश जयंती आहे. (Ganesh Jayanti 2024 date time muhurat puja vidhi maghi ganesha birth vinayak chaturthi tilkund chaturthi)
गणेश जयंती कधी आहे? (Ganesh Jayanti 2024)
माघ महिन्यातील चतुर्थीला गणेश जयंती साजरा करण्यात येते. यादिवशी महाराष्ट्रात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसांसाठी बाप्पाची पूजा करण्यात येते. तर काही ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळ बाप्पाची स्थापना करुन मनोभावे पूजा केली जाते.
गणेश जयंती तारीख आणि मुहूर्त!
चतुर्थी तिथी – 12 फेब्रुवारी 2024 – संध्याकाळी 05 : 44 वाजेपासून 13 फेब्रुवारी 2024 दुपारी 02 : 41 वाजेपर्यंत
उदय तिथीनुसार गणेश जयंती ही 13 फेब्रुवारी 2024 ला साजरी करण्यात येणार आहे.
गणेश पूजा मुहूर्त – 13 फेब्रुवारी 2024 सकाळी 11:40 वाजेपासून दुपारी 01:58 वाजेपर्यंत
गणेश जयंती 2024 शुभ योग – गणेश जयंतीला सर्वार्थ सिद्धीसोबत साध्या आणि सिद्ध योग तयार होत आहेत. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 07:04 ते दुपारी 12:35 वाजेपर्यंत आहे.
गणेश जयंती पूजा!
माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करा. सर्वप्रथम लाकडी पाट किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड पसरून त्यावर गणरायाचा फोटो किंवा मातीची किंवा घरातील तांबी, पितळ, चांदीची मूर्ती स्थापन करा. त्यानंतर पाण्याने स्नान करून वस्त्र, हार, फुले, दुर्वा, फुलांच्या माळा, सिंदूर, हळद, ओले अक्षत इत्यादी गणेशाला अर्पण करा. 16 षोडशोपचारने पूजा संपन्न झाल्यावर आरती करा. देवाला तिळ आणि गुळाचं नैवेद्य दाखवायला विसरु नका. आता अथर्वशीर्षाचं पठण करा. यादिवशी आठवणीने बाप्पाला 21 दुर्वा वाहा. त्याशिवाय गणेश मंत्र, गणेश चालीसा, गणेश स्तोत्र, गणेश चतुर्थी व्रत कथा पाठ तुम्ही करु शकता.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)