नवरदेव झोपायला गेला, अन् थोड्याचवेळात खोलीतून किंकाळ्यांचा आवाज आला, तरुणाच्या गळ्यावर २६ टाके

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ceiling Fan Fall On Groom: एक दिवसापूर्वी तरुणाचे लग्न झाले. शुक्रवारी रात्री लग्नाचे सर्व विधी झाले. शनिवारी सकाळी थकलेला नवरदेव खोलीत झोपायला गेला. मात्र थोड्याच वेळात त्याच्या खोलीतून किंचाळ्यांचा आवाज आला. कुटुंबीयांनी आत जाऊन पाहताच त्यांच्या पायाखालची जमिनच हादरली आहे. 

मार्बल व्यापारी असलेल्या इकराम सिसोदिया याचा निकाह ९ मे रोजी जन्नत मेहमूदसोबत झाला होता. शुक्रवारी रात्री निकाहच्या विधी झाल्यानंतर शनिवारी सकाळी जन्नत पुन्हा तिच्या माहेरी गेली. तर, लग्नात आलेल्या थकव्यामुळं इकराम त्याच्या खोलीत झोपायला गेला. त्यानंतर सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास त्याच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज आला. इकरामचा आवाज ऐकताच त्याचे कुटुंबीय खोलीत धावत गेले. 

खोलीत जाताच त्यांन इकराम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या गळ्यावर व हातावर गंभीर जखम होती. तर, पलंगाच्या एका बाजूला सिलिंग फॅन पडलेला होता. इकराम झोपलेला असताना चालू असलेला सिलिंग फॅन त्याच्या अंगावर कोसळला. त्यामुळं पंख्याच्या पातीमुळं इकरामच्या गळ्यावर व हातावर गंभीर जखमा झाल्या. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. 

इकराम गंभीर जखमी झाला होता तसंच रक्तही खूप वाया गेले होते. त्यामुळं डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यास सुरुवात केली. इकरामच्या गळ्याजवळीत रक्तवाहिनी कापली गेली आहे. त्यामुळं रक्त जास्त वाहत आहे. कोणत्या दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याची परस्थितीदेखील नव्हती. त्यामुळं सरकारी रुग्णालयातच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. इकरामच्या गळ्यावर तब्बल २६ टाके घालण्यात आले आहेत. आधीपेक्षा इकरामची स्थिती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत, मकराना येथील हेड कॉन्स्टेबल प्रकाश यांनी रुग्णालयात जाऊन इकरामचा जबाब नोंदवला आहे. तसंच, त्याच्या घरी जाऊन तो झोपला होता ती खोलीदेखील पाहिली आहे. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांची चौकशीदेखील केली आहे. 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इकरामने पंजाबमधील अंबाला येथे मार्बलचे एक गोदाम खरेदी केले आहे. तसंच, पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत आहेत. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. तसंच, हा घातपात आहे की अपघात याचा शोध घेत आहेत. इकरामची प्रकृती स्थिर असून तो धोक्याच्या बाहेर आहे, असं पोलिसांनीही सांगितलं आहे. 

गंभीर जखमी झालेल्या इकरामचे वडिल रमजान सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या खोलीत माझा मुलगा झोपला होता. तिथला पंखा खूप जुना होता. पण तो कसा कोसळला हे आम्हालादेखील कळले नाही. या घटनेची परिसरात खूप चर्चा आहे. 

Related posts