Narmada Jayanti 2024 Katha : माता नर्मदेचा जन्म कसा झाला? तिला का म्हणतात कुमारी नदी? जाणून घ्या पौराणिक कथा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Narmada Jayanti 2024 : हिंदू धर्मानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला नर्मदा जयंती साजरी करण्यात येते. हिंदू धर्मात गंगा मातेला जेवढं विशेष स्थान असतं तसंच नर्मदेलाही विशेष स्थान असल्याच म्हटलं जातं. हिंदू धर्मात गंगेनुसार नर्मदा नदीत स्नान केल्यास पापमुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होते असं म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का की नर्मदा नदीचा जन्म कसा झाला आणि तिला कुमारी नदी असं का म्हटलं?  (Narmada Jayanti Vrat Katha How was mother Narmada born Why Narmada is called Kumari River in marathi)

माता नर्मदेचा जन्म कसा झाला? 

पौराणिक मान्यतेनुसार असं म्हटलं गेल आहे की, भगवान शंकर मखल पर्वतावर तपश्चर्येत मग्न असताना त्यांच्या घामातून नर्मदेचा जन्म झाला असं म्हणतात. शास्त्रात नर्मदा याचा अर्थ सुख असं होतं. भगवान शिवाने नर्मदेला आशीर्वाद दिला होती की, जो नर्मदेला भेट देईल त्याला आशीर्वाद प्राप्त होईल. त्याशिवास नर्मदेचा जन्म हा मैकल पर्वतावर झाला, म्हणून तिला मैकाल राजाची कन्या असंही म्हटलं जातं. 

नर्मदा जन्माबद्दल अजून एक आख्यायिका आहे. त्यात असं म्हटलं आहे की, दैवी कन्या नर्मदा भगवान शिवाकडून मैकाल पर्वतावर प्रकट झाली होती. नर्मदा हे नाव देवतांनी ठेवलं असं म्हणतात. नर्मदाने भोलेनाथाची हजारो वर्ष तपश्चर्या  केली. एकेदिवशी भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी नर्मदेला पापांचा नाश करण्याचा आशीर्वाद दिला आणि तिच्या काठावर सर्व देवी देवता वास करतील असं म्हटलं. तसंच नदीच्या सर्व दगडांवची शिवलिंगाच्या रूपात पूजा होईल असं वरदान नर्मदा नदीला शंकराने दिली. 

नर्मदाला का म्हणतात कुमारी नदी? 

तिसऱ्या आख्यायिकामध्ये असं म्हटलं आहे की, राजा मैखलाची कन्या नर्मदा यांच्या लग्नाची घोषणा केली. राजाने अशी घोषणा केली की गुलबकवलीचे फूल आणणाऱ्या व्यक्तीशी नर्मदाचं लग्न होईल. अनेक राजपुत्र आले पण कोणीही अट पूर्ण केली नाही. तेव्हा राजकुमार सोनभद्र यांनी गुलबकवलीच्या फुल आणं आणि त्याच नर्मदेशी लग्न ठरलं. 

राजकन्या नर्मदेला सोनभद्र यांची भेट घ्यायची होती. नर्मदाने मैत्रिण जुहिला हिला तिचा निरोप घेऊन राजकुमारकडे जाण्यास सांगितलं. जुहिला गेली आणि बराच वेळ झाल्यानंतरही ती परतली नाही. नर्मदे चिंतेत पडली आणि ती जुहिला शोधण्यास सुरुवात केली. शोधता शोधता नर्मदा सोनभद्राकडे पोहोचली आणि तिथे जुहिला राजकुमारासोबत पाहिलं. हे पाहून नर्मदा संतापली आणि तिने आयुष्यभर कुमारी राहण्याच व्रत घेतलं आणि विरुद्ध दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नर्मदा अरबी समुद्रात विलीन झाली, असं म्हणतात. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts