साधूने घराबाहेर खेळणाऱ्या 5 वर्षाच्या मुलाला जमिनीवर आपटून केलं ठार, मृत्यू होईपर्यंत त्याने….; हादरवणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मथुरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साधूच्या वेषातील एका व्यक्तीने 5 वर्षाच्या मुलाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. मुलगा घराबाहेर खेळत असताना आरोपीने त्याला उचलून जमिनीवर आपटलं. जोपर्यंत मुलाचा मृत्यू होत नाही तोवर आरोपी त्याला उचलून खाली आपटत होता. तिथे उपस्थित लोकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर धाव घेतली आणि आरोपीला बेदम मारहाण केली. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारवाई केली जात आहे. आरोपीला अटक करण्यात…

Read More