ओ वुमनिया! गोळ्या घालणाऱ्यांचा महिलेकडून झाडू घेऊन पाठलाग; VIDEO पाहूनही बसणार नाही विश्वास

( प्रगत भारत । pragatbharat.com) हरियाणाच्या भिवनी येथे घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत अविश्वसनीय घटना कैद झाली आहे. येथील घराबाहेर एक व्यक्ती उभा असताना दोन दुचाकींवरुन आलेल्या चौघांनी गोळीबार केला. यावेळी शेजारच्या घरातील महिला झाडू घेऊन आली आणि हल्लेखोरांना पळवून लावलं. हे सीसीटीव्ही दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.  ज्याच्यावर गोळीबार करण्यात आला त्याची ओळख पटली असून हरिकिशन असं त्याचं नाव आहे. रवी बॉक्सच्या हत्येप्रकरणी तो आरोपी आहे. त्याचे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. हरिकिशन सध्या जामीनावर बाहेर आहे. तीन महिन्यांपूर्वी भिवनी पोलिसांनी हरिकिशनच्या हत्येचा कट रचल्याचा…

Read More