कर चुकवण्यासाठी खोटे पुरावे जोडताय? एका चुकीमुळे भरावा लागेल 200 टक्के दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : ITR Filing 2023- 24 : गेल्या काही दिवसांमध्ये आयकर (Income Tax) वाचवण्यासाठी पगारदार वर्गातून आयकर विवरण पत्रात (ITR) खोटी माहिती देऊन रिफंड मिळवण्याचे प्रकार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. उदाहर्णार्थ आपल्या रक्ताच्या नातेवाईकाच्या नावानेच असलेल्या घरांमध्ये राहण्याचे भाडे दिल्याचे दाखवून अनेक पगारदार घरभाडे भत्त्यापोटी मिळालेल्या रक्कमेवरचा कर चुकवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.  प्रत्यक्षात असे कोणतेही घरभाडे न देताच आयकर कायद्यातील सवलतींचा फायदा घेण्याचा हा प्रकार सर्रास केला जातो. पण यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी आयकर विभाग सज्ज झालाय. आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा (AI) मदतीनं…

Read More