( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : (Job Opportunities ) रोजगार निर्मिती हे भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं. अमेरिकेतील पेन्सेलिव्हेनिया विद्यापिठातील प्राध्यपक रोहित लांबा आणि रघुराम राजन यांनी एकत्र येऊन ‘ब्रेकिंग द मोल्ड रिइमॅजिनिंग इंडियाज इकॉनोमिक फ्यूचर’ (‘Breaking the mould: Reimagining India’s economic future’) हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील वाटचालीची दिशा कशी असावी यावर भाष्य केलं आहे. गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढत्या आलेखाचा (Indian Economy) उहापोह करताना राजन…
Read MoreTag: जनत
“पाकिस्तानी जनता चंद्रावर राहते! चंद्रावर गॅस, पाणी, वीज नाही इथंही नाही”; उडवली स्वत:चीच खिल्ली
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Mission Pakistani Reaction: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने 23 ऑगस्टचा दिवस जगाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवला. इस्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत विक्रम लँडर भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर टचडाऊन झालं आणि भारतासहीत जगभरामध्ये एकच जल्लोष झाला. दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडींग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. एकंदरित चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरला असून केवळ अमेरिका, रशिया आणि चीनलाच ही कामगिरी करता आली आहे. आता या यादीत भारताचाही समावेश झाला असून जगभरातून भारतावर…
Read More