( प्रगत भारत । pragatbharat.com) कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी पुन्हा एकदा भारतावर आरोप केले आहेत. एका पत्रकारने जस्टिन ट्रूडो यांनी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येच्या तपासात काय प्रगती आहे? जर काही प्रगती नसेल तर अमेरिका आणि कॅनडाने भारताप्रती कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे का? अशी विचारणा केली. याचं उत्तर देताना जस्टिन ट्रूडो यांनी पुन्हा एकदा संसदेत केलेल्या सर्व आरोपांची पुनरावृत्ती केली. जस्टिन ट्रूडो म्हणाले की, सुरुवातीलाच जेव्हा आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून कॅनडाच्या भूमीवर एका कॅनडीयन नागरिकाची भारती सरकारच्या एजंट्सनी हत्या केल्याची माहिती मिळाली तेव्हा आम्ही…
Read More