भांग पिऊन हॉटेलच्या बाल्कनीत आला, तितक्यात फटाके वाजले अन्..; परदेशी नागरिकाचं धक्कादायक कृत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Janmashtami 2023 : देशभरात काही दिवसांपूर्वीच कृष्ण जन्मोत्सव (Janmashtami) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अशातच जन्माष्टमीच्या दिवशी राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमधून (Jaipur) एक विचित्र घटना समोर आली आहे. फटाक्यांचा आवाज ऐकून एका परदेशी नागरिकाने थेट हॉटेलच्या खोलीतून खाली उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशी नागरिकाच्या या कृतीमुळे त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. हॉटेलमधून उडी मारल्याने त्याचे हात-पाय तुटले आहेत तसेच इतरही गंभीर जखमा झाल्या आहेत. बुधवारी राजस्थाताली विविध जिल्ह्यांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. दिवसभर विविध जिल्ह्यांतील राधा-कृष्ण मंदिरात भेटी सुरू…

Read More