भांग पिऊन हॉटेलच्या बाल्कनीत आला, तितक्यात फटाके वाजले अन्..; परदेशी नागरिकाचं धक्कादायक कृत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Janmashtami 2023 : देशभरात काही दिवसांपूर्वीच कृष्ण जन्मोत्सव (Janmashtami) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अशातच जन्माष्टमीच्या दिवशी राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमधून (Jaipur) एक विचित्र घटना समोर आली आहे. फटाक्यांचा आवाज ऐकून एका परदेशी नागरिकाने थेट हॉटेलच्या खोलीतून खाली उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशी नागरिकाच्या या कृतीमुळे त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. हॉटेलमधून उडी मारल्याने त्याचे हात-पाय तुटले आहेत तसेच इतरही गंभीर जखमा झाल्या आहेत.

बुधवारी राजस्थाताली विविध जिल्ह्यांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. दिवसभर विविध जिल्ह्यांतील राधा-कृष्ण मंदिरात भेटी सुरू होत्या. मात्र संध्याकाळ जसजशी जवळ येत होती, तसतशी श्रीकृष्ण जन्माष्टमी तयारी सुरु झाली होती. मात्र श्रीकृष्ण जन्मोत्सवानंतर ही घटना घडली आहे ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. फटाक्यांचा आवाज ऐकताच या परदेशी नागरिकाने हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. यामुळे त्याचे हात पाय फ्रॅक्चर झाले आहेत.

फटाक्यांचा आवाज ऐकून एका 33 वर्षीय नॉर्वेजियन नागरिकाने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रात्री हॉटेलच्या बाल्कनीतून उडी मारली होती. डीसीपी (पूर्व) ज्ञान चंद्र यादव यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की नो फिन वेटल नावाच्या पर्यटकाने गुरुवारी भांगच्या प्रभावाखाली हे कृत्य केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहर सर्कल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विवेक विहार येथील एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर नो फिन वेटल थांबला होता. जन्माष्टमीनिमित्त मध्यरात्रीनंतर जवळच्या मंदिरांमध्ये जल्लोष सुरू होता. फटाक्यांचा आवाज हा फिनला गोळीबाराचा आवाज वाटला. त्यामुळे त्याने आरडाओरड सुरु करत मदत मागितली. त्यानंतर तो त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि काही मिनिटांनंतर त्याने बाल्कनीच्या खिडकीतून उडी मारली.

मध्यरात्री  12.30 च्या सुमारास, जगतपुरा येथील हरे कृष्ण मंदिरात तैनात असलेल्या पोलीस अधिकार्‍यांना एका सुमारे एक लाख भाविकांच्या गर्दीवर लक्ष ठेवण्याचे काम करण्यात आले होते. त्यावेळी रेडिओ कॉलवर पोलिसांना एक परदेशी नागरिक रस्त्यावर पडला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी नो फिनला रुग्णालयात दाखल केले.

फिलला पोलिसांनी जयपूरिया रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्याचे हात आणि पाय फ्रॅक्चर झाल्याचे समोर आलं आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरु केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. पोलिसांनी फिलच्या म्हणण्यावरुन गोळीबाराचे पुरावे शोधण्यासाठी घटनास्थळाची तपासणी देखील केली. मात्र तिथे तसं काहीसुद्धा आढळलं नाही. मात्र इतर पर्यटकांशी बोलल्यानंतर आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना समजले की, मध्यरात्री मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले होते.

तीन महिन्यांपूर्वी आला होता भारतात

पोलिसांनी सांगितले की, पीडित फिल हा नॉर्वेच्या नमसोमचा रहिवासी आहे. योग सत्रात सहभागी होण्यासाठी तो तीन महिन्यांपूर्वी भारतात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, फिल हा भांग प्यायला होता. त्यामुळे त्याने हॉटेलच्या खोलीतून खाली उडी मारली.

Related posts