धक्कादायक! सामूहिक बलात्कारानंतर आरोपी कपडेही घेऊन गेले, नग्न अवस्थेत मागत होती मदत, लोकांना वाटली वेडी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

राजस्थानच्या भीलवाडा येथे एक संतापजनक घटना घडली आहे. येथे एका तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. तरुणी जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडली असता आरोपींनी तिचं अपहरण केलं आणि नंतर सामूहिक बलात्कार केला. तरुणीच्या शरिराचे लचके तोडल्यानंतर ते एवढ्यावरच थांबले नाहीत. आरोपी जाताना पीडित तरुणीचे कपडेही घेऊन गेले. महिला नग्न अवस्थेत रस्त्यावर लोकांची मदत मागत असताना, तिची अवस्था पाहून लोकांनी तिला वेडी समजून दुर्लक्ष केलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. शनिवारी रात्री तरुणी जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडली होती. याचवेळी तीन तरुणांनी तिचं अपहरण केलं आणि गाडीतून घेऊन गेले. यानंतर आरोपींनी महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. यानंतर तिन्ही आरोपी महिलेला निर्वस्त्र सोडून, कपडे घेऊन घटनास्थळावरुन फरार झाले. 

आरोपी कपडे घेऊन गेल्याने तरुणी नग्न अवस्थेत जीवाच्या आकांताने ओरडत लोकांकडे मदत मागत होती. पण तरुणीची अवस्था पाहून लोक तिला वेडी समजून दूर जात होते. अखेर काही ग्रामस्थांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. 

सीट कव्हरने झाकलं शरीर

यादरम्यान, एका व्यक्तीने तिचं म्हणणं ऐकून घेतलं आणि पोलिसांना कळवलं. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सर्वात प्रथम जीपच्या सीट कव्हरने तिचं शरीर झाकलं. यानंतर पोलीस तिला घेऊन स्टेशनला घेऊन गेले. पोलीस स्थानकात गेल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून कपडे मागवून तिला देण्यात आले. नंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं.

घटनास्थळी पोलिसांना सापडल्या फुटलेल्या बांगड्या

घटनेचं गांभीर्य लक्षात घेत भीलवाडाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विमल सिंह नेहरादेखील गंगापुरात दाखल झाले. ज्यांच्याकडे सध्या भीलवाडाच्या पोलीस अधीक्षकाची जबाबदारी आहे. घटनास्थळी पोलिसांना काही आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अपहरण केलं तेव्हा  आरोपी नशेत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरुन पुरावे जमा केले आहेत. तसंच पोलिसांना घटनास्थळी फुटलेल्या बांगड्या सापडल्या आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. यावेळी त्यांनी आरोपींना कडक शिक्षा देत तरुणीला न्याय देण्याची मागणी केली. पीडित तरुणीची सध्या वैद्यकीय चाचणी केली जात आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपींना लवकर अटक केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. 

Related posts