पाहता-पाहता 95 शाळकरी मुली झाल्या लुळ्या; एकाचवेळी इतक्या जणींना पक्षाघात आल्याचे पाहून डॉक्टरही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Trending News In Marathi: सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. देशाच्या छोट्याशा खेड्यात घडलेली एखादी घटनाही लगेचच समोर येते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ हे तर आपण प्रत्येकजण पाहतोच. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात शाळकरी मुलींचे वागणे विचित्र असल्याचे दिसत आहे. या मुलींनी भयंकर आजाराने ग्रासले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केन्या देशातील हा प्रकार असल्याचे सांगण्यात येतंय. 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत हा प्रकार केन्या देशातील असून तेथील एका शाळेतील आहे. येथील काकामेगा काउंटी येथील महाविद्यालयातील 95 विद्यार्थिनींसोबत काहीतरी विचित्र घटना घडली आहे. सेंट थेरेमा एरगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी मागील काही आठवड्यापासून रुग्णालयात दाखल आहेत. एका भयंकर आजारामुळं त्यांच्या शरीराचा कंबरेखालचा भागाला अर्धांगवायूचा झटका आल्यासारखे वाटत आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओत, शाळेचा गणवेश घातलेल्या मुलींना स्वतःच्या पायावर नीट उभंही राहता येत नाहीये. त्या अडखळत अडखळत त्या चालताना दिसत आहेत. एकमेकींचा आधार घेत त्या एका खोलीत जात आहेत. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. या कथित महामारीमुळं विद्यार्थिनीच्या पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

स्थानिक मीडियानुसार, अचानक या मुलींच्या पायातील ताकदच निघून गेली आणि पायातील त्राण निघून गेले आहेत. अचानक अशी परिस्थिती का उद्भवली यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसंच, शाळेतच असं काही घडलं आहे का, याचीही चौकशी करण्यात यावी असं अशी मागणी करण्यात येत आहे. 

काकामेगा काउंटी येथील आरोग्य विभागाचे सीईओ बर्नाड वेसोन्गा यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात महामारीचे कारण शोधण्यासाठी मुलींचे ब्लड सॅम्पल, युरीन आणि स्टुलचे सॅम्पल घेण्यात आले आहेत. त्यांना टेस्टसाठी पाठवण्यात आले असून अद्याप त्याचे रिपोर्ट समोर आले नाहीयेत. मात्र आतापर्यंत मुलींची ही अवस्था कशामुळं झाली हे मात्र समोर आलेले नाहीये. या घटनेनंतर शाळा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. 

Related posts