जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? जगातील सर्वात धोकादायक Nuclear Missile तैनात; सर्वच देशांचं टेन्शन वाढलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia Sarmat Nuclear Missile: युक्रेनविरुद्ध सुरु असलेल्या युद्धादरम्यान रशियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वात धोकादायक अस्रांपैकी एक असलेलं सॅरमॅट नावाचं आण्विक क्षेपणास्त्र रशियाने सज्ज ठेवलं आहे. हे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युरोपातील अनेक छोटे मोठे देशांची खास करुन नाटोच्या सदस्य देशांची चिंता वाढली आहे. रशियन अंतराळ संस्थेचे प्रमुख यूरी बोरिसोव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “सॅरमॅट क्षेपणास्राला सेवेत दाखल करुन घेण्यात आलं आहे,” असं बोरिसोव म्हणाले. युक्रेन युद्धानंतर नाटो देश आणि रशियामध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या महायुद्धाची चर्चा…

Read More