( प्रगत भारत । pragatbharat.com)
Rajasthan Crocodile Viral Video : शहरातील रस्ते हे कायम वाहनं आणि लोकांच्या वर्दळाने गजबजलेला असतो. रात्री तो काहीसा शांत होतो. तेही रात्र तशीच होती रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीत लोक निवांत झोपली होती. शहर असल्याने रस्त्यावर काही वाहनांची ये जा सुरु होती. अन् क्षणार्धात त्या रस्त्यावरील वाहन जागीत थांबल्या…कारण त्यांनी रस्त्यावर महाकाय विशाल अशी मगर पाहिली होती…(trending video crocodile crossing road in kota rajasthan viral video on Social media google trending news )
हो, ऐकून धक्का बसला ना…पण हे खरं आहे. कल्पना पहिलीकडील ही घटना घडली आहे राजस्थानमधील कोटा शहरात. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो सध्या इंटरनेटवर ट्रेंडिंगमध्ये आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक भलीमोठी मगर रस्त्याच्या एका कडेवरुन दुसऱ्या दिशेला जाताना दिसत आहे. याआधीही कोटा शहरातील बजरंग नगर आणि परिसरात मगरींचं दर्शन झालं आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये कायम भीती दिसून येते. गेल्या अनेक वर्षीही वन्यजीव विभागाच्या पथकाने शहरातील निवासी परिसरातून दोन डझनहून अधिक मगरींना पकडण्यात आलं होतं.
कोटा शहरातील नागरिकांचं म्हणं आहे की, चंबळ नदी शहरातून वाहते त्यामुळे या नदीने शहराचा बहुतांश भाग व्यापून घेतला आहे. त्यामुळे कालव्यातून अनेक वेळा मगरी या शहरातील रस्त्यांवर दिसतात. अगदी कोटा शहरातील मोठ्या नाल्यांमध्येही मगरी मोठ्या संख्येने दिसून येतात.
कोटातून बाहेर पडणारी चंद्रलोही नदी पुढे जाऊन चंबळ नदीला भेटते. या नदीत वर्षानुवर्षे मगरींचं साम्राज्य दिसून आलं आहे. शहरातील रस्त्यांवर असो किंवा शेतात मोठ्या मोठ्या महाकाय मगरी ये जात असतात. त्यामुळे नागरिकांपासून शेतकऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण आहे.
वन्य जीवनाच्या माहितीनुसार हे दिवस मगरींचा प्रजनन हंगामाचा असतो. त्यामुळे नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात मगरीही अंडी घालताना दिसून येतात. यामुळे या वन्यजीव विभगाकडून नदीकाठी धोक्यादायक सूचनांचे फलक लावलेले असतात.
Crocodile roams freely on the streets of Kota, Rajasthan. pic.twitter.com/ncjV3I6fYI
— Naren Mukherjee (@NMukherjee6) July 20, 2023
दरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर Naren Mukherjee या अकाऊंटवर कोटा शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या मगरीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.