Fenugreek or Methi Seeds benefits for Control Uric Acid Know How to Use; सांध्यांमध्ये जमा झालेल्या क्रिस्टल युरिक अ‍ॅसिडला मुळापासून उपटून काढेल मेथी, ३ पद्धतीने करा सेवन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मेथीचे पाणी प्या

मेथीचे पाणी प्या

युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी मेथीचे पाणी फार गुणकारी ठरते. तुम्ही त्याचे पाणी दोन प्रकारे तयार करू शकता. पहिल्या पद्धतीत तुम्ही १ चमचे मेथी १ ग्लास पाण्यात उकळून खाऊ शकता. दुस-या पद्धतीत मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर सकाळी उठून त्याचे सेवन करा. यातील पाण्याचे काही दिवस सेवन केल्यास युरिक अ‍ॅसिड नियंत्रित राहण्यास मदत होते.

मोड आलेली मेथी युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करेल

मोड आलेली मेथी युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करेल

यूरिक अ‍ॅसिडची समस्या दूर करण्यासाठी अंकुरित मेथीचे सेवन केले जाऊ शकते. अंकुरित मेथीचे सेवन केल्याने तुमच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. यासाठी 1 ते 2 चमचे मेथी भिजवून सुती कापडात गुंडाळून 2 ते 3 दिवस राहू द्या. लक्षात ठेवा की, कापड ओलसर राहावे जेणेकरून मेथीचे दाणे अंकुरित होतील. यानंतर, रिकाम्या पोटी याचे सेवन करा. यामुळे युरिक अ‍ॅसिड नियंत्रित राहण्यास मदत होते.

​(वाचा – Thyroid आणि Weight Loss च्या समस्येला चुटकीसरशी दूर करेल हे ड्रायफ्रुट्स, असा करा डाएटमध्ये समावेश)​

​मेथी भिजवून चघळा

​मेथी भिजवून चघळा

युरिक अ‍ॅसिडची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही भिजवलेले मेथीचे दाणेही खाऊ शकता. यासाठी मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्यातील पाणी वेगळे करा आणि मेथी दाणे चघळल्यानंतर खा. त्यासोबत तुम्ही पाणीही पिऊ शकता. यामुळे युरिक अ‍ॅसिड नियंत्रित राहण्यास मदत होईल.

युरिक अ‍ॅसिडची समस्या कमी करण्यासाठी मेथी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. जर तुमची समस्या खूप वाढत असेल तर अशा परिस्थितीत तज्ज्ञांची मदत जरूर घ्या.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts