लग्न लागताच पत्नीचा कारनामा; सासरवाडी गाठत नवरदेव म्हणाला- मेहुणीसोबत लावून द्या!

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Trending News In Marathi:  मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न लागलं नवरदेव त्यांच्या नववधुला घेऊन घरी आला. लग्नाची हळददेखील उतरली नव्हती पण तितक्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने नवरदेवाच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. 

लग्नाचे विधी झाल्यानंतर नवरदेव वधुला घेऊन घरी आला. मोठ्या धुमधडाक्यात तिचे सासरी स्वागत झाले. नवरा-नवरीची ओळखही नीट झाली नव्हती. सुहागरात्रीच्या आधीच नवरीच्या कारनाम्याने नवरदेवाच्या स्वप्नांवर पाणी फेरले. त्यानंतर त्यांने तातडीने सासुरवाडी गाठली आणि नवरीच्या लहान बहिणीसोबत लग्न करण्याची मागणी केली. नवरदेवाच्या या मागणीमुळं एकच गोंधळ निर्माण झाला आहे. 

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातून ही घटना घडली आहे. लग्नानंतरच्या सर्व विधींना सुरुवात झाली होती. घरात आनंदाचे वातावरण होते. नवरदेवही आनंदात होता. मात्र, लग्नानंतर संध्याकाळी या आनंदाच्या वातावरणात मिठाचा खडा पडला. संध्याकाळी नववधुने शौचालयात जायचं असं सांगितले. तेव्हा तिला घरात असलेल्या बाथरुममध्ये जाण्यास सांगितले. मात्र नववधुने बाहेरच जाणार असा हट्ट धरला. तेव्हा कुटुंबीयांनी ती गावाकडची आहे असा समज करुन तिला रात्र झाल्यावर घराबाहेर जाण्यास सांगितले. 

घराबाहेर पडल्यानंतरही खूप वेळ झाला ती आली नाही म्हणून तिला शोधण्यास सुरुवात केली. खूप शोधाशोध केल्यानंतरही ती सापडली नाही. त्यानंतर घरात शोध घेतल्यानंतर लग्नातील दागिने आणि रोख रक्कमही गायब असल्याचे कळले. त्यानंतर घरात एकच गोंधळ उडाला. लग्नाघरात एकच दुखी वातावरण पसरले. 

घटनेनंतर नवरदेवाने तातडीने तिच्या घरी पोहोचला. त्यानंतर त्याने घडलेली सर्व घटना सासरी सांगितली. तेव्हा सासरच्यांनीही याबाबत काही माहिती नसल्याचे सांगत हात वर केले. त्यानंतर नवरदेवाच्या कुटुंबीयांनी आपल्या इज्जतीचा प्रश्न असल्याचे सांगत नवरीच्या लहान बहिणीसोबच लग्न लावून द्यावे, अशी विचित्र मागणी केली. नवरदेवाची मागणी एकून सासरच्या लोकांनीही आश्चर्य व्यक्त केले. 

नवरदेवाच्या या मागणीवर विचार करण्यासाठी सासरच्या लोकांनी चार दिवसांचा वेळ मागितला होता. त्यानंतर नवरीच्या लहान बहिणीसोबत लग्न लावून द्यायचे की नाही हे ठरवण्यात येईल. 

Related posts