( प्रगत भारत । pragatbharat.com)
Crime News: एका अल्वपयीन मुलीचं (Minor Girl) अपहरण (Kidnapping) केल्यानंतर तिला धावत्या रिक्षातून बाहेर फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारच्या (Bihar) गया (Gaya) जिल्ह्यातील तनकुप्पा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गया-राजौली रस्त्यावर ही घटना घडली आहे. आरोपी रिक्षातून पळ काढत असतानाच स्थानिकांनी त्यांचा पाठलाग सुरु केला होती. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपींनी अपहरण केल्यानंतर अल्पवयीन मुलीने आरडाओरड सुरु केली होती. मुलीचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी तिचा पाठलाग सुरु केला होता. यानंतर स्थानिकांनी रिक्षा चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे.
दरम्यान, या झटापटीत मुलगी जखमी झाली असून तिला मगध मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं आहे. बेशुद्ध अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिच्यावर उपचार सुरु असल्याचं वृत्त ANI ने दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन लोकांनी बरतरा बाजार परिसरात मुलीला जबरदस्त रिक्षात बसण्यास भाग पाडलं. यानंतर ते पळून जाऊ लागले होते. जेव्हा मुलीने मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला तेव्हा स्थानिकांनी रिक्षाचा पाठलाग सुरु केला.
स्थानिकांनी पाठलाग सुरु केल्यानंतर आरोपी घाबरले. यानंतर त्यांनी मुलीला धावत्या रिक्षातून खाली फेकून दिलं. पण यानंतरही स्थानिक रिक्षाचा पाठलाग करत राहिले. अखेर त्यांनी चालकाला पकडलं. चालकाला पकडल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला आपल्या ताब्यात घेतलं.
पोलीस स्थानकाचे अधिकारी रंजन कुमार यांनी सांगितलं आहे की, रिक्षा चालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. मुलगी एकदा शुद्धीत आल्यानंतर आम्ही अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करु.