india up uttarakhand ghazipur accident seven people death after mini bus hits high tension wire

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bus Accident : हायटेंशन तारेच्या (High Tension Wire) संपर्कात आल्याने एका प्रवासी बसने जागेवरच पेट घेतला. एका क्षणात संपूर्ण बस आगीच्या (Bus Accident) विळख्यात आली. बसमध्ये अनेक प्रवासी होती, आग लागताच बसमधल्या प्रवाशांनी किंचाळ्या आणि आरडाओरडा सुरु केला. बसमध्ये वृद्ध, महिला, लहान मुलं प्रवास करत होती. या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेशमधल्या गाझीपूरमध्ये (Ghazipur) ही दुर्देवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल दाखल झाले.

पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार गाझीपूरमधल्या महाहर धामनजीक एक मीनी बस हायटेंशन तारेच्या संपर्कात आली. 11 हजार व्होल्टची ही हायटेंशन तार होती. यामुळे बसने क्षणाधार्त पेट घेतला. आग इतकी भीषण होती की आग विझवण्यासाठी बसजवळ जाण्यासही कोण तयार होत नव्हतं. त्यामुळे पेटत्या बसमध्ये अनेक प्रवासी अडकले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकिय अधिकारी दाखल झाले आणि तात्काळ बाचवकार्य सुरु करण्यात आलं. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या भीषण अपघातात अर्धा डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. आ घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

बसमध्ये वऱ्हाडी
जखमी व्यक्तींपैकी एकाने दिलेल्या माहितीनुसार या बसमध्ये लग्नाचं वऱ्हाड होतं. उत्तर प्रदेशमधल्या मऊ या ठिकाणाहून ही बस महाहर धाम येथे येत होती. या बसमध्ये जवळपास 30 प्रवासी होते. कच्च्चा रस्त्यावरुन जात असताना बस हायटेंशन तारेच्या संपर्कात आली. बसला आग लागताच एकच अफरातफरी माजली, लोकांनी बसमधून उड्या मारत जीव वाचवण्या प्रयत्न केला. पण महिला आणि लहान मुलं बसमध्येच अडकली. 

बस अपघातात जखमी झालेल्या मीरा नावाच्या महिलेने बसमध्ये जवलपास 40 ते 50 लोकं असल्याची माहिती दिली. यातल्या अनेकांचा मृत्यू झाल्याचं तीने सांगितलं. आपण पुढे बसल्याने मला कोणीतरी बसच्या बाहेर फेकलं. पण माझी मुलं बसमध्ये मागे बसली होती, ती अडकल्याचं सांगत महिलेला अश्रु अनावर झाले. 

मुख्यमंत्री योगींनी घेतली दखल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाझीपूर बस अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. प्रशासकिय अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसंच जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही दिल्या. अपघात मृत झालेल्या व्यक्तींबद्दल योगी आदित्यनाथ यांनी संवेदना जाहीर केली.

Related posts