फाशी देण्यापूर्वी कैद्याला शेवटची इच्छा का विचारतात? यामागे दडलंय कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Last Wish Before Death Penalty: खून, बलात्कारासारखे गुन्हा किंवा दहशतवादी कृत्यामध्ये दोषी आढळलेल्यांना फाशीची शिक्षा झालेली आपण पाहिले आहे. टीव्ही मालिका किंवा चित्रपटांमध्ये आपण फाशीचे अनेक प्रसंग पाहत असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावण्यात येते तेव्हा त्या व्यक्तीला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते, हे आपण अनेकदा पाहिले आहे. असे असताना एखाद्या कैद्याला किंवा गुन्हेगाराला त्याची शेवटची इच्छा का विचारली जाते? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? तुम्ही कधी कोणाला हा प्रश्न विचारला आहे का?  नसेल तर आपण याचे उत्तर जाणून घेऊया.

तुम्ही कधी विचार करण्याचा प्रयत्न केला आहे का की, शेवटची इच्छा विचारल्यावर ‘माझी फाशीच रद्द करा’, असे कैदी सांगत नाही. यामागेही कारण आहे.

वास्तविक, फाशी देण्यापूर्वी कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारण्याची परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे. मृत व्यक्तीची शेवटची इच्छा पूर्ण झाली नाही तर त्याचा आत्मा भटकत राहतो, अशी समज पूर्वापार चालत आली आहे. म्हणूनच आजही जेव्हा एखाद्या कैद्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते तेव्हा त्याला फाशी देण्यापूर्वी त्याची शेवटची इच्छा नक्कीच विचारली जाते.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, तुरुंग नियमावलीत कैद्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची कोणतीही तरतूद नाही. दिल्ली तुरुंगात बराच काळ कायदा अधिकारी असलेले सुनील गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. जर एखादा गुन्हेगार आपली शेवटची इच्छा पूर्ण करण्याच्या नावाखाली त्याला फाशी देऊ नये असे म्हणत असेल तर तसे होऊ शकत नाही. म्हणूनच शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी जेल मॅन्युअलमध्ये कोणतीही तरतूद नाही. पण परंपरेनुसार आजही कैद्यांना त्यांची शेवटची इच्छा विचारली जाते.

फक्त या ३ इच्छा होतात पूर्ण

फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची संधी दिली जाते. पण या इच्छेची व्याप्ती निश्चित करण्यात आली आहे. शेवटच्या इच्छेच्या नावावर, कैद्याच्या फक्त खालील तीन इच्छा पूर्ण केल्या जातात.

१) जर एखाद्या कैद्याने त्याच्या आवडीचे कोणतेही अन्न खाण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याची इच्छा जेल प्रशासनाकडून आनंदाने पूर्ण केली जाते.

२) याशिवाय, शेवटची इच्छा म्हणून, कैदी त्याच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. अशावेळी जेल प्रशासन त्याची त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत भेट घालून देतात.

३) ज्यामध्ये कैदी त्याच्या शेवटच्या वेळात आपल्या धर्माचा कोणताही पवित्र ग्रंथ वाचण्याची इच्छा व्यक्त करतो. अशावेळी त्याची इच्छा देखील पूर्ण होते.

Related posts