gujrat news 20 years girl took an extreme step in surat due to mobile addiction

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mobile Addiction : सध्याच्या युगात अन्न, पाणी आणि निवारा याबरोबरच मोबाईल देखील माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. घरबसल्या एका क्लिकवर सर्व कामं होऊ लागली आहेत. जेवणापासून ऑनलाईन शॉपिंगपर्यंत आणि बँकेच्या कामापासून बिलं भरण्यापर्यंत सर्व कामं मोबाईलद्वारे केली जातात. मोबाईल हा आजच्या काळाची गरज बनला आहे. पण सदुपयोग झाला तर मोबाईल एक वरदान आहे. पण याचा दुरुपयोग करणाऱ्यांसाठी मोबाईल हा शाप आहे. अगदी लहान वयापासूनच मुलांच्या हातात पालक मोबाईल देऊ लागले आहेत. पण अनेकवेळा याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आह.

मोबाईलने घेतला जीव
मोबाईलच्या अतिवापरामुळे (Mobile Addiction) सूरतमध्ये 20 वर्षांच्या एका मुलीला आपला जीव गमवावा लागला. मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी तिच्या पालकांनी अनेक उपाय केले. पण काही केल्या मुलगी यातून बाहेर येऊ शकली नाही. अखेर त्या मुलीने आत्महत्येचं पाऊल उचललं. 

काय आहे नेमकी घटना?
सूरतमधल्या गोपीपूरा भागात राहाणाऱ्या वीस वर्षांच्या विशाखा राणा हिला मोबाईलचं व्यसन जडलं होतं. दिवसभर विशाखा मोबाईलमध्ये गुंतून असायची. मोबाईलवर व्हिडिओ पाहायचे, रिल्स बघायाचे याची तिला सवयच झाली होती. मुलीच्या या सवयीमुळे कुटुंब हैराण झालं होतं. यासाठी त्याने अनेक उपाय केले, पण मुलीचं मोबाईलचं व्यसन काही केल्या सुटत नव्हतं. शेवटी कुटुंबाने मुलीला मानोसोपचार (Psychiatrist) तज्ज्ञांकडे नेलं. तिथे तिच्यावर उपचार सुरु झाले. पण याचाही फारसा परिणाम मुलीवर झाला नाही.

फेस एक्सरसाईजची सवय
यादरम्यान विशाखा इंटरनेटवरचे व्हिडिओ पाहून फेस एक्सरसाईज करु लागली. मान आणि तोंड वाकडं करुन बोलतात, याचे व्हिडिओ पाहून ती त्याचं अनुकरन करु लागली. घरच्यांसोबतही ती मान आणि तोंड वाकडं करुन बोलू लागली. तिचं विचित्र वागणं पाहून घरचे हादरले. तिला पुन्हा डॉक्टरकडे उपचारासाठी नेण्यात आलं. तिच्यावर दोन महिने उपचार सुरु होते. अनेक गोळ्या, इंजेक्शन तिल्या देण्यात आले. विशाखाच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार सतत तसं बोलल्याने तिचा चेहराही वेडावाकडा झाला होता. 

डॉक्टरांच्या उपचारानंतर कुटुंबियांनी तिला मोबाईल देणं बंद केलं. पण याचा विपरीत परिणाम झाला. विशाखा आणखी अस्वस्थ झाली. घटनेच्या दिवशी संध्याकाळी घराच्या गच्चीवर जात तीने गळफास घेत आत्महत्या केली. कुटुंबियांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. मुलीच्या जाण्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या मुलांना प्रमाणापेक्षा जास्त मोबाईलचा वापर करायला देऊ नका असं आवाहन विशाखाच्या कुटुंबियांनी केलं आहे.

नोट : तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतल्या कोणाच्या मनात आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचे विचार आले तर भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइन 18002333330 वर संपर्क साधा. इथ तुमची ओळख पूर्णपणे गोपनिय ठेवली जाते. तज्ज्ञांकडून या मनस्थितीतून बाहेर पडण्यास मदत कली जाते. लक्षात ठेवा आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते एकदाच मिळतं.

Related posts