बायकोला त्याच्यासोबत नको त्या अवस्थेत पाहिले, पतीने केलं भयानक अन् पोलिसांत गेला

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Husband Killed Wife And Her Lover: तीन मुलांची आई प्रियकरासोबत खोलीत होती. त्याचवेळी महिलेचा पती आला. (Love Affair News) दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले अन् डोक्यात राग घालून घेतला. रागाच्या भरात त्याने पत्नी व तिच्या प्रियकरांना जीवे ठार मारले आहे. पत्नी व तिच्या प्रियकराची (Boyfriend) हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःच पोलिसांना हत्येची कबुली दिली व पोलिस स्टेशनमध्ये सरेंडर झाला आहे. (Husband Killed Wife)

दुहेरी हत्याकांडाने गावात खळबळ

उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यातील ही घटना आहे. गावात दुहेरी हत्याकांडाची घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्येची सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आरोपीचे नाव शोभराम दोहरे असं आहे. गावात मोठ्या संख्येने पोलिस फौज तैनात करण्यात आली आहे. 

पत्नीला दुसऱ्याच्या मिठीत पाहिले अन्…

शोभरामला त्याची पत्नी रागिणी आणि गावातच राहणाऱ्या सिंकू यादव याचे अफेअर असल्याची कुणकुण लागली होती. मात्र त्याने याबाबत कधी पत्नीला जाब विचारला नव्हता. घटनेच्या दिवसी मात्र त्याला दोघेही रंगेहात सापडले. शोभरामने रात्रीच्या वेळी दोघांनाही नको त्या अवस्थेत पाहिलं. पत्नीला प्रियकराच्या मिठीत पाहून त्याचा संताप अनावर झाला. 

पोलिसांसमोर सरेंडर झाला

रागाच्या भरात शोभरामने रागिणी आणि सिंकू यांना कपड्याने बांधून ठेवले व त्यांना मारहाण केली. तरीही त्याचा राग शांत झाला नाही. त्यानंतर आरोपीने विटांनी वार करत दोघांनाही ठार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. तर, आरोपीने स्वतःहूनच पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. 

तीन मुलं अनाथ झाली

शोभराम आणि रागिणी दोघांनीही तिन मुलं आहेत. त्यातील एक मुलगी ही तिच्या आजी-आजोबांच्या घरी राहते. तर, दोन मुलं रागिणी आणि शोभरामसोबत राहात होते. या घटनेने दोन्ही कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आई-वडिलांच्या चुकीमुळं तिन्ही मुलांच्या डोक्यावरील पालकांचे छत्र हिरावले आहे. तिन्ही मुलं अनाथ झाली आहे. 

पोलिसांकडून अधिक तपास सुरू

या घटनेमुळं गावातही एकच खळबळ उडाली आहे. सिंकूच्या कुटुंबीयांनी शोभरामविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तर, गावातही या घटनेने दहशत निर्माण झाली आहे. शोभराम आणि रागिणींच्या मुलांचा सांभाळ सध्या त्याचे आजी-आजोबा करत आहेत.

Related posts