Vastu Tips : शोक हरणारे अशोकाचे झाड तुमच्याकडे आहे का? सुख समृद्धीसाठी सोमवती अमावस्या आणि गुढीपाडव्याला करा ‘हे’ उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Somwati Amawasya Vastu Tips in Marathi : फाल्गुन महिन्यातील आज शेवटी अमावस्या ही सोमवारी आल्यामुळे याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येला पितृदोषासाठी महत्त्वाची असते. त्यासोबत सोमवती अमावस्येला अशोकाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. वास्तूशास्त्र तज्ज्ञ श्वेता यांनी घरात सुख समृद्धी नांदावी, घरातील नकारात्मक शक्तीचा नाश व्हावा त्यासोबत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सोमवती अमावस्या आणि गुढीपाडव्याला अशोकाच्या झाडाशी संबंधित उपाय सांगण्यात आलंय. (Vastu Tips for Somwati Amawasya and Gudi Padwa ashoka tree benefits remedies upay for money)

अशोकाचे झाड भगवान विष्णूचे आवडते झाड मानले जाते. त्यामुळे कुठल्याही शुभ कार्यात या पानांचा वापर आजही करण्यात येतो. अशोकाचा अर्थ म्हणजे जिथे शोक नसेल असं हे अशोकाचं झाड प्रत्येकाच्या घरात असावं असं श्वेता सांगतात. हे झाड तुम्ही तुमच्या अंगणात किंवा इमारतीच्या परिसरातही लावू शकता. अशोकाचं झाड लावल्यामुळे घरातील नकारात्मक शक्तीचा नाश होतो, असं सांगण्यात आलंय. 

अशोक झाडासंबंधात उपाय!

अशोकाची पाने घरात ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहते, अशी मान्यता आहे. शुक्रवारी 11 अशोकाची पाने लाल कपड्यात बांधून आपल्या घराच्या पैशा जिथे ठेवतात तिथे ठेवा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे. 
ज्योतिष शास्त्रानुसार अशोक वृक्षाचे मूळ शुभ मुहूर्तावर किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी घरी आणून ते स्वच्छ पाण्यात धुवून, कोरडे करून तिजोरीत ठेवावे. असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासणार नाही.

जर तुमच्या व्यवसायात मंदी असेल आणि तुम्हाला त्यात प्रगती हवी असेल तर अशोकाच्या पानांची माळ बनवून तुमच्या दुकानाच्या किंवा कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगवा. असे केल्याने तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जाईल.
मुलांना अभ्यासात नको वाटत असेल तर त्यांनी अशोकाच्या पानांनी सरस्वतीची पूजा करावी. असे केल्याने मुलांचे ज्ञान वाढते. यासोबतच करिअरमध्ये चांगली नोकरीही मिळते.

शास्त्रानुसार अशोक वृक्षाला नियमित पाणी अर्पण करणाऱ्या व्यक्तींना मानसिक आजार, घरगुती वाद, कर्ज इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो. अशोकाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून रोखते.

या मंत्राचा जप करा

ऊँ ह्रीं दुं दुर्गायै नम: 
किंवा 
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
, ओम ग्राम देवताभ्यो नमः,
ओम विघ्नविनाशक देवताभ्यो नमः,
ओम कुल देवताभ्यो नमः,
ओम लक्ष्मीपती देवताभ्यो नमः.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts