धक्कादायक! खासदाराच्या घरातूनच पत्नी आणि मुलाचे अपहरण; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News : आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) सत्ताधारी पक्ष वायएसआरसीपीच्या (YSR Congress) खासदाराची पत्नी आणि मुलासह तिघांचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाईत करत काही तासातच तिघांचीही सुटका केली आहे. पोलिसांनी (Andhra Pradesh Police) अपहरण करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी पैशासाठी खासदाराच्या कुटुंबीयांचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. मात्र खासदाराच्याच पत्नी आणि मुलाचेच अपहरण झाल्याने आंध्र प्रदेशमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस पक्षाचे खासदार एमव्हीव्ही सत्यनारायण यांच्या पत्नी, मुलगा आणि लेखापरीक्षक यांचे गुरुवारीअपहरण करण्यात आले होते. मात्र, पोलिसांना अपहरणाची गुप्त माहिती मिळताच पाच तासांतच त्यांची सुटका केली आणि आरोपींना अटक केली. या सगळ्या नाट्यमय घडामोडीवेळी खासदार एमव्हीव्ही सत्यनारायण हे हैदराबादमध्ये होते. ज्योती आणि सत्यनारायण यांचा मुलगा यांच्या व्यतिरिक्त, त्यांचे जवळचे लेखापरीक्षक मित्र आणि व्यावसायिक भागीदार गन्नमणी व्यंकटेश्वर राव यांचे अपहरण आरोपींनी केले होते. खासदाराच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाचे घरातून अपहरण करण्यात आले, तर व्यंकटेश्वर अपहरणकर्त्यांना भेटायला गेले असता त्यांचे अपहरण करण्यात आले.

आरोपींनी खासदाराची पत्नी ज्योती आणि मुलगा शरद यांचे अपहरण करून खंडणी मागितली होती. त्यानंतर खासदार जी. व्यंकटेश्वर राव यांचे लेखापरीक्षक पैसे देण्यासाठी आले असता अपहरणकर्त्यांनी त्यांचेही अपहरण केले. कोला व्यंकट आणि हेमंत कुमार अशी अपहरणकर्त्यांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. विशाखापट्टणम स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष गन्नमणी व्यंकटेश्वर हे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या जवळचे मानले जातात. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी 15 पथके तयार करून आरोपींना काही तासांत जेरबंद केले. या सर्व अपहरणकर्त्यांना पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. 

विशाखापट्टणमचे पोलिस आयुक्त त्रिविक्रम वर्मा यांनी गुरुवारी सांगितले की, “गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि सर्वांना सोडवलं आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना खासदाराच्या ‘ऑडिटर’चे अपहरण झाल्याची माहिती मिळाली होती. आम्ही तातडीने चेकपोस्ट उभारले आणि ‘ऑडिटर’च्या चालकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही कारचा शोध घेतला. अपहरणकर्ते कारमधून पद्मनाभम भागाकडे जात असल्याचे आढळले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.”

खासदार सत्यनारायण आणि गन्नमणी यांच्या हे सिरीपुरम परिसरातील ग्रेटर विशाखा महानगरपालिका कमिशनरच्या घराजवळील पेडावलटेअर वरच्या भागात सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे सध्या जोरदार काम सुरु आहे.नकथितरित्या ख्रिश्चन अल्पसंख्याक समाजाची ही मालमत्ता वादात होती असेही म्हटलं जात आहे. मलकापुरम भागातील चोपरी हेमंत कुमार हा या मागचा मुख्य सुत्रधार असल्याचे बोलले जात आहे. त्याने सत्यनारायण यांची पत्नी आणि मुलाचे अपहरण केले आणि गन्नमणी यांना फोन केला. अपहरणकर्त्यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांचेही अपहरण करण्यात आले. 

Related posts