Dhup Aarati in home every day evil forces will be destroyed;रोज घरी धुपारत केल्यास वाईट शक्तींचा होईल नाश, करिअरच्या सर्वोच्च स्थानी पोहोचाल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dhup Aarati: आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. यासाठी लोक अनेक प्रकारचे उपायही करतात. वाईट शक्ती आणि नकारात्मकतेपासून घराचे रक्षण करण्यासाठी दररोज घरांमध्ये परमेश्वराची पूजाअर्चा केली जाते. पूजेत धूप-दिवे लावले जातात. देवासमोर रोज अगरबत्ती लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आणि घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो, असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रात घरामध्ये धूप जाळण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. रोज धुपारत केल्याने घरात सुख-शांती नांदते आणि शनिदेवही प्रसन्न राहतात, असे मानले जाते.

धुपाच्या धुरामुळे नकारात्मकता होते  दूर

ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये धूप लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक उर्जा संचारते. यामुळे मन शांत राहते आणि वास्तुदोषही दूर होतात.
एखाद्याला अंधत्व आले असेल किंवा त्याच्यावर जादूटोणा झाला असेल तर धुपाचा उपाय करता येतो, असे मानले जाते. यासाठी तुपात लोबान, मोहरी आणि गुग्गुळ मिसळून संध्याकाळी ठेवा. आता एक भांडे पेटवा आणि या भांड्यात हे मिश्रण जाळून धूर काढा. असे सतत 11 दिवस केल्याने नकारात्मक शक्ती निघून जातात, असे म्हटले जाते. 

धुप जाळण्याचे फायदे जाणून घ्या 

– ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या ठिकाणच्या वातावरणात नकारात्मकता आहे असे तुम्हाला वाटत असेल तेथे धुपाच्या कांड्या जाळा. धूप, गूळ आणि तूप एकत्र करुन जाळा. त्यामुळे  नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक उर्जा मिळते.

– शास्त्रानुसार एखाद्याची आर्थिक स्थिती खराब असेल तर शनिवारी धूप जाळून हवन करावे. यामुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.

– घरात वारंवार भांडणे होत असतील किंवा घरातील वातावरण अशांत राहिल्यास रोज संध्याकाळी धूपाचा धूर करावा. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि शांततेचे वातावरण राहील.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.) 

Related posts