( प्रगत भारत । pragatbharat.com)
Tata Group IPO: शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी चांगली संधी शोधताय. आता टाटा टेक्नॉलॉजीच्या (Tata Technologies) आयपीओचा मार्ग मोकळा झाला आहे. बाजार नियामक सेबीने (SEBI) टाटा समूहाच्या या कंपनीच्या आयपीओच्या अर्जाला मान्यता दिली आहे. टाटा टेक्नॉलॉजीने मार्च महिन्यात IPOसाठी अर्ज केला होता. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर आधारित असेल. टाटा समुहाच्या (TATA Group) कंपनीचा IPOहा तब्बल १९ वर्षांनंतर येत आहे. त्यामुळं गुंतवणूकीसाठी ही चांगली संधी ठरु शकते. 9 मार्च रोजी टाटाने सेबीकडे DRPH फाइल पाठवली होती. त्यानंतर आज तब्बल चार महिन्यांनंतर IPOला हिरवा कंदिल मिळाला आहे. (Tata IPO)
टाटा समुहाची कंपनी TCSचा IPO जुलै 2004साली आला होता. त्यानंतर टाटाकडून एकाही आयपीओची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळं स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुक करणाऱ्या कित्येक दिवसांपासून या संधीची वाट पाहत होते. टाटा ग्रुपचा हा आयपीओ अनेक कारणांसाठी खास आहे.
टाटा टेक्नॉलॉजी ही टाटा ग्रुपची कंपनी टाटा मोटर्सची उपकंपनी आहे. कंपनीने ९ मार्च 2023 रोजी सेबीकडे अर्ज केला होता. टाटा टॅक्नॉलॉजी या IPOच्या माध्यमातून 9.57 कोटी शेअर्स म्हणजे 23.6 टक्क्यांची विक्री करण्यात येईल, असा अंदाज बांधला जात आहे. तसंच, या IPO अंतर्गत टाटा मोटर्स आपल्या उपकंपनीचे ८१,१३३,७०६ शेअर्स विकणार आहेत. टाटाचे इतर दोन भागधारक, अल्फा टीसी होल्डिंग्ज आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंडदेखील या अतंर्गंत शेअर्स विकतील.
टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसचा (TCS) IPO 2004 साली आला होता. आज TCS देशातील दुसऱ्या क्रमांकाली सर्वाधिक मूल्य असणारी कंपनी आहे. दरम्यान, टाटा टेक्नोलॉजी डिजीटलचा जगातील अग्रगण्य कंपन्यांच्या यादीत समावेश आहे. या आयटी स्टॉकने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला होता. या कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 11.7 लाख कोटी रुपये आहे.
Tata Technologies ची स्थापना 33 वर्षांपूर्वी झाली आहे. Tata Technologies प्रोडक्ट इंजिनीअरिंग आणि डिजीटल सर्व्हिसच्या व्यवसायाशी संबंधित आहे. ही कंपनी ऑटोमेटिव्ह, इंडस्ट्रियल हेवी मशीनरी आणि एरोस्पेस सेक्टर्समध्येही या कंपनीकडून सेवा देण्यात येतात.
दरम्यान, कंपनीने सेबीकडे IPOचे कागदपत्रे दिले आहेत. मात्र, त्यासाठी किती फंड जमा करण्यात येईल आणि IPOची प्राइस व्हॅल्यू काय असेल, याची माहिती अद्याप समोर आली नाहीये. लवकरच कंपनीकडून ही माहिती सांगितली जाण्याचे शक्यता आहे.