60 वर्षांपासून जागतोय ‘हा’ व्यक्ती, 1962 साली घडलेल्या ‘त्या’ घटनेने उडवली झोप

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sleepless Man: उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी चांगली झोप घेणे गरजेचे असते. रोजचे काम करण्यासाठी रोज आठ तास गाढ झोप आवश्यक असते. झोप पूर्ण न झाल्यास दिवसभर सुस्ती जाणवते. तसंच, सगल दोन-तीन दिवस झोप न घेतल्यास तब्येतही बिघडू शकते. मात्र, जगात काही व्यक्ती याला अपवाद असतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत जो एक दोन नव्हे तर तब्बल 61 वर्ष झोपला नाहीये. 

व्हियतनाम येथे राहणारा एक व्यक्तीला तब्बल 61 वर्ष झोप येत नाहीये. या व्यक्तीचे नाव थाय एनजॉक असे आहे. आता थाय यांचे वय 80 वर्ष इतके आहे. एनजॉक यांच्या दाव्यानुसार लहानपणी त्यांच्यासोबत अशी एक घटना घडली होती त्यामुळं त्यांच्यापासून त्यांची झोपच हिरावून घेतली आहे. झोप येण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले मात्र त्याचा काहीएक फायदा झाला नाही. 

मीडिया रिपोर्टनुसार, थाय यांना लहानपणी ताप आला होता. तेव्हापासून त्यांना झोपच येत नाही. या समस्येपासून हैराण झालेल्या थाय यांनी अनेक डॉक्टरांची भेट घेतली. मात्र त्याचा काहीएक फायदा झाला नाही. थाय यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीला गाढ झोप घेताना पाहताना त्यांच्या मला अशी झोप कधी लागणार, असाच विचार त्यांच्या मनात येतो. 

थाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1962मध्ये त्यांची झोप त्यांच्यापासून हिरावली आहे. अनेक दशके त्यांच्या पत्नी, मुलं आणि मित्रपरिवाराने त्यांना झोपताना कधीच बघितलं नाहीये. आजपर्यंत त्यांनी अनेक टेस्ट केल्या मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. 

थाय हे झोप न घेताही फिट आणि तदुंरस्त  आहेत. ते आजही अनेक तास न थकता काम करु शकतात. आरोग्यपूर्ण आहार ते घेतात. त्याचबरोबर थाय यांना ग्रीन टी आणि वाइन पिण्याचा शौक आहे. डॉक्टरांनी झोप न येण्याच्या स्थितीला इनसोम्निया असं म्हटलं आहे. यामध्ये व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर परिणाम होतो. 

अलीकडेच एका युट्युबरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की, त्यांनी कितीही अंग मेहनतीचे काम केले तरी बाकी लोकांच्या तुलनेत त्यांना कमी थकवा जाणवतो. इतकं काम करुनही मला थोडावेळासाठीही झोप येत नाही. कधीतरी खूप जास्त मद्यपान केल्यास 1-2 तासांसाठी झोप येते. मात्र तरीही गाढ झोप लागत नाही. इतरवेळी तर मी टक्क जागा असतो, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, कधीतरी मलाही इतर लोकांसारखी गाढ झोप लागेल, अशी मला आशा आहे आणि मी त्यादिवसाची वाट पाहतोय, असं त्यांनी म्हटलं आहे. 

Related posts