What Is High Uric Acid Level Or Gout Treatment And Prevention; युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढली आहे कसे समजेल? काय कराल सोपा उपाय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हाय युरिक अ‍ॅसिडची पातळी काय आहे

हाय युरिक अ‍ॅसिडची पातळी काय आहे

What Is High Uric Acid Level: युरिक अ‍ॅसिड हे रक्तात आढळणारे अपशिष्ट अर्थात Waste आहे. प्युरिन नावाच्या केमिकल तुटल्याने युरिक अ‍ॅसिड तयार होते. अधिक स्वरूपात युरिक अ‍ॅसिड हे रक्तात मिसळून किडनीतून फिल्टर होऊन लघ्वीवाटे निघून जाते.

काही अन्नपदार्थ आणि पेय ज्यामध्ये प्युरिन अधिक प्रमाणात आढळते शरीरातील युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढवतात. यामध्ये साल्मन, शिंपले, कोळंबी, सार्डिन मासे, लाल मांस, लीव्हर मीट, अल्कोहोलचे प्रमाण अधिक असते. शरीरात युरिक अ‍ॅसिड अधिक वाढले तर त्याला हायपरयुरेमिया असं म्हटलं जातं.

हायपरयुरेमिया म्हणजे काय

हायपरयुरेमिया म्हणजे काय

युरिक अ‍ॅसिड जेव्हा शरीरात खड्यांच्या अर्थात क्रिस्टल स्वरूपात जमा होऊ लागतात तेव्हा सांधेदुखी सुरू होते. तसंच याचा एक प्रकार गाऊटदेखील आहे. यामुळे सांध्यात अत्यंत त्रास सुरू होतो आणि किडनीमध्ये जमा झाल्यामुळे स्टोनही तयार होतो.

यावर वेळीच उपचार न झाल्यास सांधे आणि हाडांना हानी पोहचू शकते. युरिक अ‍ॅसिड शरीरात अधिक वाढू लागल्यास, त्याला हायपरयुरेमिया असं म्हणतात. यामुळे किडनी डॅमेज, डायबिटीससारखे आजार संभवतात.

(वाचा – पावसाळ्यात सकाळी उठताच प्या आयुर्वेदिक चहा, आजार राहतील दूर)

युरिक अ‍ॅसिड पातळी वाढली कसे ओळखाल

युरिक अ‍ॅसिड पातळी वाढली कसे ओळखाल

How Are High Uric Acid And Gout Diagnosed: ब्लड टेस्ट करून तुम्ही शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी किती वाढली आहे ते समजून घेऊ शकता. किडनीतून काढण्यात आलेल्या खड्यांच्या तपासणीनेही युरिक अ‍ॅसिडची पातळी तुम्ही जाणून घेऊ शकता. गाऊटच्या परिस्थितीत युरिक अ‍ॅसिड क्रिस्टल स्वरूपात आढळते. ज्याबाबत हाडे, सांधे यांचे अल्ट्रासाऊंड, एक्स रे अथवा सिटी स्कॅन करून तपासणी स्वरूपात कळू शकते.

(वाचा – गोलमटोल पोट आणि मांड्यांवरील लटकलेल्या चरबीवर उत्तम इलाज ठरेल हे पाणी, उपाशीपोटी पिऊन व्हा स्लीम ट्रीम)

युरिक अ‍ॅसिड पातळी वाढल्यास उपाय

युरिक अ‍ॅसिड पातळी वाढल्यास उपाय

Treatment Of High Uric Acid Level: गाऊट संदर्भात सूज आणि त्रास कमी करण्यासाठी ध्यानधारणेचा तुम्ही आधार घ्यावा. तसंच जास्त पाणी पिणे हा त्यावर एक उपाय असून कोणत्याही पद्धतीचे अल्कोहोल आणि स्वीट सॉफ्ट ड्रिंकपासून दूर राहा. रोज किमान ८-१० ग्लास पाणी प्यावे.

(वाचा – वजन झर्रकन कमी करण्यासाठी समाविष्ट करून घ्या ६ ड्रायफ्रूट्स, लवकरच होईल पोट सपाट)

हाय युरिक अ‍ॅसिड पातळीपासून वाचणे शक्य?

हाय युरिक अ‍ॅसिड पातळीपासून वाचणे शक्य?

अधिक काळापर्यंत आजारापासून वाचण्यासाठी युरिक अ‍ॅसिडची पातळी नियमित करता येऊ शकते. तसंच ही पातळी नियंत्रित करून सांधेदुखीपासून सुटका करता येते. तसंच यावर डॉक्टरांचा योग्य उपाय करून वजन कमी करण्यासाठी, प्युरिनची पातळी कमी करणारे अन्नपदार्थ खाऊन याची पातळी कमी करता येते.

संदर्भ

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3247913/

https://emedicine.medscape.com/article/241767-treatment

https://www.mayoclinic.org/diseases-conditions/gout/diagnosis-treatment/drc-20372903

[ad_2]

Related posts