Viral Video : चिमुरडी आपल्या डान्सने जिंकतेय नेटकऱ्यांची मनं, व्हिडीओ पाहून तुम्हीही नाचायला लागाल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dance Viral Video : सोशल मीडियावर लहान्यांपासून मोठ्यापर्यंत नाचतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. इंस्टाग्रामवर ओपन केलं की आपल्याला असंख्य डान्स व्हिडीओ पाहिला मिळतात. काही रील तर कितीही वेळा बघितले तरी मनं भरत नाही. अगदी ते व्हिडीओ आपण आपल्या इन्स्टा फोल्डरमध्ये सेव्हही करुन ठेवतो. असाच एका चिमुकलीचा डान्स इन्स्टाग्रामवर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

एकदा काय तुम्ही एखादा व्हिडीओ किंवा रील सोशल मीडियावर शेअर केली की तो जर यूजर्सला आवडला की तो ट्रेंड होतो. या चिमुकलीचा डान्स व्हिडीओही सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखा पसरतोय. (Trending Girl Dance Video Instagram Reels Viral on Internet google trend)

हिचा डान्स पाहून तुम्ही प्रेमात पडाल

या सोशल मीडियावर ट्रेंड झालेल्य व्हिडीओमध्ये चिमुकली खास स्टाइलमध्ये डान्स करताना दिसतं आहे. निळा रंगाचा ड्रेस आणि त्यावर क्यूट चेहऱ्यावर पिंक रंगाचा चष्मा…एका लग्न समारंभ किंवा कुठल्या तरी मिरवणुकीत संगीताच्या तालावर ही चिमुकली थरकायला लागली. ती नाचण्यात इतकी तल्लीन झाली आहे की, तिला जगाचा विसर पडला आहे. 

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता तिच्या बाजूला काही महिलादेखील डान्स करत आहेत. पण ही चिमुकली एकटीच आपल्या जगात डान्सचा आनंद घेत आहे. तुम्ही पाहू शकता एका गाडीवर भल्लमोठ म्युझिक सिस्टीम आहे. चिमुकलीचा डान्स पाहून आजूबाजूला नाचत असलेल्या महिलांचं लक्षही तिच्याकडे होतं. अगदी एक महिला तिचा मोबाईलवर डान्स करताना दिसत आहे. या चिमुकलीसोबत एक पुरुष डान्स करताना दिसतं आहे. 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर babyss_galleryandbabys_wall या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. चिमुकलीच्या या रीलने नेटकऱ्यांना वेड लावलं आहे. ही रील जोरात व्हायरल होते आहे. या रीलवर असंख्य वेगवेगळ्या कमेंट्स येतं आहेत. एका यूजर्सने लिहिलं आहे की, ‘Wow cute baby’

सोशल मीडियावर हजारो लाखो व्हिडीओ पाहिला मिळतात. पण काही व्हिडीओ पाहून मनं अगदी प्रसन्न होऊन जातं. त्यातील या चिमुकलीचा व्हिडीओ अगदी तसाच आहे. जगाचं कुठलंही टेन्शन नाही कि कसली लाज नाही. बस आपलं एक छोटंस आनंदी जग…आयुष्यातील क्षणाचा ती मनमुराद आनंद लुटतेय. हा व्हिडीओ पाहून असंच म्हणावसं वाटचतं लहानपण देगा देवा!

 

Related posts