विवाहित प्रेयसीला भेटायला आला, पतीने दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलं, नंतर घडलं भयंकर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Love Affair News: अनैतिक संबंधाच्या प्रकरणातून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशच्या झाशी जिल्ह्यात एक भयानक घटना समोर आली आहे. विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणासोबत भयंकर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

गोलू नावाच्या तरुणाचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तीन वर्षांपूर्वी तिचे लग्न दुसरीकडे करण्यात आले. प्रेयसीच्या लग्नानंतरही तो तिला विसरु शकला नाही. गोलू प्रत्येक आठवड्याला तिला भेटण्यासाठी जात होता. 30 जून रोजी गोलू त्याच्या पत्नीला सांगून घराबाहेर पडला. एका महत्त्वाच्या कामासाठी कानपूरला जात असल्याचे त्याने सांगितले. मात्र, पूर्ण दिवस तो घरी परतला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी खूप ठिकाणी शोधले. दोन दिवस त्याचा शोध घेतल्यानंतरही त्याची काहीच खबर लागली नाही. त्यामुळं कुटुंबीयांनी अखेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

1 जुलै रोजी पोलिसांनी गोलूचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पोलिसांना त्याच्या प्रेयसीबाबत माहिती मिळाली. गोलूच्या कुटुंबीयांनी काही अनुचित प्रखार घडला असावा, अशी भीतीही व्यक्त केली होती. त्यामुळं पोलिसांचा रोख तिच्याकडे अधिक होता. 

पोलिसांना माहिती मिळाली की, गोलू कानपूरला जाण्याऐवजी आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला होता. त्यानंतर पोलिस ओराई येथे पोहोचले. तिथे अधिक तपास केला असता कानपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रेयसीच्या नातेवाईकांची गाडी सीसीटीव्हीमध्ये दिसली होती. त्यानंतर लगेचच पोलिसांनी तपासाची चक्रा फिरवली त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पोलिसांनी प्रेयसीच्या घरावर छापा टाकला आणि तिचे वडील आणि भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. 30 जूनच्या रात्री गोलू प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला होता. तेव्हा त्याच्या जावई अवधेशने आपली पत्नी आणि तिचा प्रियकर गोलू या दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. त्यानंतर संतापलेले अवधेशने गोलूला डांबून ठेवले आणि पत्नीच्या पालकांना बोलवून घेतले. 

प्रेयसीचे कुटुंबीय आल्यानंतर तिचा भाऊ, पती आणि वडिलांनी मिळून गोलूला रात्रभर बेदम मारहाण केली. यानंतर 1 जुलैच्या रात्री प्रियकर गोलूला मद्यधुंद अवस्थेत झाशीला आणले. पुन्हा झाशीला येताना पती अवधेश, वडिल आणि बावाने मिळून गोलूच्या डोक्यात हातोड्याने वार करत हत्या केली. 

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने हा खळबळजनक खुलासा केला आहे. दरम्यान गोलूची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्यांना रिकाम्या प्लॉटमध्ये दफन केले होते. पोलिसांनी तिथे जाऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, या घटनेने नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी आरोपी असलेला गोलूच्या प्रेयसीचा पती अवधेश, वडील, भाऊ मयंक, मेव्हणा दीपक आणि ड्रायव्हर शरद यांना अटक करून तुरुंगात पाठवले. त्याचवेळी दुसरा मारेकरी दीपकच्या शोधात पोलीस छापेमारी करत आहेत.

Related posts