Why Japanese People Sleep on Mat Know 6 Health Benefits of Sleeping on Mat; जपानी लोक गादी, बेडऐवजी चटईवर का झोपतात? शरीराला मिळतात ६ आरोग्यदायी फायदे पण या लोकांनी मात्र टाळावे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​पाठदुखीपासून सुटका मिळेल

​पाठदुखीपासून सुटका मिळेल

Healthline ने दिलेल्या माहितीनुसार ज्यांना पाठ किंवा पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी फक्त मजबूत पृष्ठभागावर झोपावे. सपाट जागेवर झोपल्याने वेदनांपासून थोडा आराम मिळू शकतो. काही लोक अशा गादीवर झोपतात, जे त्यांच्या शरीराच्या वजनानुसार खूप मऊ असतात. जेव्हा गादी खूप मऊ असते, तेव्हा तुमचे शरीर गादीवर सपाट पडू शकत नाही, ज्यामुळे झोपेची स्थिती खराब होऊ शकते. अशा स्थितीत तुमचा मणका अलाइनमेंटमधून बाहेर पडतो. त्यामुळे मणक्यावर दाब वाढून पाठदुखी सुरू होऊ शकते. म्हणून चटईवर झोपणे फायदेशीर असते.

(वाचा – Sadhguru यांनी सांगितलेल्या ७ टिप्सने थुलथुलीत लटकणारी चरबी करा कमी, शरीरच नाही तर मनही राहील प्रसन्न )

​पोस्चर सुधारला जाऊ शकतो

​पोस्चर सुधारला जाऊ शकतो

जमिनीवर झोपल्याने शरीराची मुद्रा किंवा पोस्चर बरोबर राहते. वाईट आसनात झोपल्याने पाठदुखीची समस्या वाढते. तसेच, कमी लवचिकता, मणक्याचे चुकीचे संरेखन आणि दुखापतीचा धोका देखील वाढू शकतो. उत्तम आसन मणक्याच्या नैसर्गिक वक्रतेला आधार देते. जमिनीवर झोपल्याने पाठीचा कणा सरळ ठेवणे सोपे होते, कारण चटईवर शरीर सरळ राहू शकत नाही.

​(वाचा – Weight Loss Journey : प्रथमेश लघाटेने १४ किलो वजन घटवलं, आयुर्वेदाच्या दोन सिक्रेट टिप्सची मदत)​

​ब्लड सर्क्युलेशन सुधारते

​ब्लड सर्क्युलेशन सुधारते

चटईवर झोपल्याने शरीरात समान अधिक प्रमाणात रक्तदाबाचे वितरण होते. ज्यामुळे प्रेशर पॉईंट्स कमी होते आणि झोपेच्या वेळी चांगले ब्लड सर्क्यूलेशन उत्तम होण्यास मदत होते. रक्तप्रवाह चांगला झाल्यामुळे संपूर्ण आरोग्यास फायदा होतो आणि झोपेतून जागे झाल्यावर अस्वस्थता किंवा कडकपणा कमी होऊ शकतो.

​(वाचा – ६ संकेतावरून ओळखा तुम्ही गरजेपेक्षा जास्त मीठ खाताय, शरीराच्या ३ महत्वाच्या अवयवांना करतात निकामी)

​तणावापासून मिळते सुटका

​तणावापासून मिळते सुटका

चटईवर झोपल्यामुळे आपण तणावापासून दूर राहतो आणि मिड ब्रेन हेल्थ देखील उत्तम राहते. हल्लीच्या तणावाच्या दिवसांमध्ये तुम्ही चटईवर झोपल्यास डोकं शांत राहण्यास मदत होते. जपानी लोक या फायद्यांचा विचार करून चटईवर झोपणे पसंत करतात.

​​(वाचा – आईची तंबाखूची सवय जन्मतःच पडली बाळावर भारी, शरीराचा रंगच बदलला)

​निद्रानाश दूर करते

​निद्रानाश दूर करते

निद्रानाशाच्या प्रमुख कारणांपैकी एक खराब झोपेची पृष्ठभाग आहे. जर तुमची गादी तुम्हाला झोपेची समस्या देत असेल, तर चटईवर झोपणे ही योग्य कल्पना असू शकते. सुरुवातीला थोडे अस्वस्थ वाटू शकते, परंतु एकदा तुमचे शरीर जुळवून घेतल्यानंतर, तुम्हाला जमिनीवर किंवा चटईवर झोपणे अधिक आरामदायक वाटेल.

​चटईवर झोपल्याने शरीराला मिळतो गारवा

​चटईवर झोपल्याने शरीराला मिळतो गारवा

प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, उन्हाळ्यात जमिनीवर किंवा चटईवर झोपल्याने चांगली झोप येते. कारण फरशी किंवा जमीन थंड असते. त्यामुळे शरीरातील उष्णता लवकर कमी होते. खाली झोपल्याने चांगली झोप येते, विशेषतः उन्हाळ्यात. मात्र, ज्यांच्याकडे एसी, कुलर आहे, ते बेडरूममध्ये बेडवर झोपणे पसंत करतात. कूलर, एसीशिवाय दिवस घालवणाऱ्यांना खाली चटईवर झोपण्याची सवय उत्तम असते.

​(वाचा – शरीराला का आहे Vitamin H ची गरज, डायबिटिस रूग्णांनी आजच खायला सुरू करा हे ७ पदार्थ)​

या लोकांनी चटईवर झोपू नये

या लोकांनी चटईवर झोपू नये

वृद्ध लोकांनी जमिनीवर चटई टाकून झोपणे टाळावे. ज्या लोकांना काही आरोग्याच्या समस्या आहेत, जसे की चालण्यात समस्या, हाडांशी संबंधित समस्या, पाठ आणि पाठदुखी, ऍलर्जी इत्यादी, त्यांनी जमिनीवर झोपू नये. संधिवात, ऑस्टियोपोरोसिसमध्ये खाली झोपल्यास वेदना वाढू शकतात. उठताना आणि बसताना त्रास होत असेल तर जमिनीवर झोपू नका.

जर तुम्हाला जमिनीवर झोपायचे असेल तर सर्व प्रथम फरशी पूर्णपणे स्वच्छ करा. हे घाण, ऍलर्जीन, बॅक्टेरिया काढून टाकेल. जे काही चटई, गादी, पलंग तुम्ही जमिनीवर झोपाल ते मधेच स्वच्छ करत राहा.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts