मी अजूनही मुलं जन्माला घालू शकतो, नव्वदीत पाचव्यांदा बोहल्यावर चढला, अजून लग्न करण्याची इच्छा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Saudi Arabia Oldest Groom: वयाने नव्वदी गाठली तरीही सौदी अरेबीयातील या व्यक्तीची लग्न करण्याची अजूनही लग्न करण्याची इच्छा आहे. आत्तापर्यंत या व्यक्तीने पाच निकाह केले आहेत. इतकंच नव्हे तर त्याने एक अजब दावा देखील केला आहे. सौदी अरेबियातील सर्वात वयस्कर नवरदेव असलेल्या या व्यक्तीला अजून लग्न करण्याची इच्छा आहे. 

सौदी अरेबियातील माध्यमांनुसार, एका 90 वर्षांच्या व्यक्तीने पाचव्यांदा निकाह केला आहे. सध्या हा वृद्ध व्यक्ती आपल्या पत्नीसह हनिमूनला आला आहे. तिथेच त्यांनी मला पाचपेक्षा अधिक लग्न करण्याची इच्छा आहे, असं बोलून दाखवले आहे. नादिर बिन दहैम वाहक अल मुर्शीद अल ओताबी असं या व्यक्तीचे नाव आहे. तर, आपल्या लग्नाचा सेलिब्रेशन त्यांने अफीक प्रांतात केले आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. यात काही जण त्याला पाचव्या लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. तर, वृद्ध व्यक्तीही आपल्या नवीन-नवीन लग्न झाल्यामुळं उत्साहित आहे. इतकंच नव्हे तर, वृद्ध व्यक्तीच्या नातवानेही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नासाठी आजोबांना खूप खूप शुभेच्छा, तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी मी प्रार्थना करेन, असंही तो व्हिडिओत बोलताना दिसत आहे. 

सौद अरेबीयातील सर्वात वयस्कर नवरदेवाने दुबईतील एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्याचे लग्नाबाबतचे विचार जाहिर केले आहेत. या व्यक्तीने म्हटलं आहे की, माझे लग्नहे सुन्नत परंपरेनुसार झालं आहे. सगळ्या अविवाहित व्यक्तींनी लग्न केले पाहिजे, असा सल्लाही त्यानी दिला आहे. 

या व्यक्तीने म्हटलं आहे की, या निकाहानंतर मी पुन्हा निकाह करु इच्छितो. वैवाहिक जीवन सर्वात शक्तिशाली असते. अल्लाहसमोर विश्वास आणि अभिमानाचा हा विषय आहे. लग्न केल्याने आयुष्यात शांती आणि संसारात समृद्धी येते. लग्नच माझ्या निरोगी आयुष्याचे रहस्य आहे. जे तरुण लग्न करण्यासाठी टाळाटाळ करतात त्या तरुणांना मी आग्रह करतो की धर्म वाचवण्यासाठी आणि एका संपूर्ण आयुष्यासाठी लग्न करावे. 

अल ओताबी यांनी म्हटलं आहे की, लग्न करण्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळं जीवनात आनंद मिळतो. वृद्धावस्थेत लग्न करण्यावरुन त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता, मी आता हनिमूनला आलो आहे आणि खूष आहे. लग्न शारीरिक आराम आणि सुख देते. आणि वय झाल्यावर लग्न करु नये असं कोणी सांगितलं आहे, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. 

अल ओताबी यांना पाच मुलं होते त्यातील एकाचा मृत्यू झाला. ते आपल्या परिवाराबाबत बोलताना म्हणतात की, आता माझ्या मुलांनादेखील मुलं झाली आहेत. मात्र मी अजूनही मुलं जन्माला घालू शकतो. 

Related posts